scorecardresearch

पालिकेची आरोग्यसेवा ‘आजारी’

वसई-विरार शहरात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला असून ते रु ग्णांच्या जिवाशी खेळत आहेत.

doctor
प्रतिनिधिक छायाचित्र

कोटय़वधी रुपयांची तरतूद, खर्च मात्र अत्यल्प; वसई-विरारच्या अर्थसंकल्पाच्या विश्लेषणात प्रकार उघडकीस
वसई-विरार महापालिकेने अर्थसंकल्पात विकासकामांसाठी तरतूद केलेला निधी अन्य कामासाठी वळविण्यात आल्याचे प्रकरण ताजे असताना आरोग्य विभागातील निधी खर्च केला जात नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. आरोग्य सेवेसाठी महापालिकेकडून कोटय़वधी रुपयांची तरतूद केली जात आहे. मात्र खर्च अत्यल्पच केला जात असल्याने पालिकेची आरोग्य सेवा ‘आजारी’ असल्याचे दिसून येते. अर्थसंकल्पाच्या केलेल्या विश्लेषणात हा प्रकार समोर आला आहे.
वसई-विरार शहरात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला असून ते रु ग्णांच्या जिवाशी खेळत आहेत. खासगी डॉक्टर सर्वसामान्य रुग्णांची आर्थिक पिळवणूक करत असतात. अशा वेळी सर्वसामान्य नागरिकांना आधार होता तो पालिकेच्या आरोग्य सेवेचा; परंतु पालिकेच्या आरोग्या विभागात अपुऱ्या सोयी, औषधांचा तुटवडा, सुसज्ज रुग्णालयाची वानवा आहे. कोटय़वधी रुपयांची आर्थिक तरदूक करूनही हा निधी आरोग्य सेवेवर पुरेसा वापरला गेलेला नाही. पालिकेच्या अर्थसंकल्पाच्या आर्थिक विश्लेषणात ही अनास्था उघड झाली आहे.

*  पालिकने आरोग्य व्यवस्थेवर २०१३ -१४ या आर्थिक वर्षांत तरतूद केलेल्या रकमेपैकी ८६ टक्के रक्कम खर्च केली होती; परंतु २०१४-१५ या वर्षांत तरतूद रकमेच्या केवळ ६४ टक्के रक्कम खर्च करण्यात आली.
* रुग्णालय व्यस्थापन अतिशय महत्त्वाची बाब असून त्यात तरतूद केलेल्या रकमेच्या खर्चात घट होत असल्याचे दिसून आले.
*२०१४-१५ या वर्षांत पालिकेने रुग्णालय व्यवस्थापनासाठी २० कोटी ४५ लाख रुपयांच्या तरतूद केली होती. मात्र केवळ १३ कोटी २६ लाख रुपये खर्च करण्यात आले.
* २०१३-१४ मध्ये ५ कोटी ४५ लाख रकमेची तरदूत होती; परंतु त्यापैकी केवळ ४ कोटी रुपये खर्च करण्यात आले.
* औषध खरेदीसाठी २०१४-१५ या वर्षांत केवळ तीन कोटी रुपयांची तरतूद केलेली असताना केवळ १ कोटी ६९ लाख रुपये खर्च करण्यात आले.
*पालिका रुग्णालयात सतत होणारा औषधांचा तुटवडा आणि औषधाअभावी रुग्णांचे हाल होत आहेत, तरीही औषध खरेदी पालिकेने केली नाही.
* रुग्णांना कपडे, चादरी, ब्लँकेटखरेदी, धुलाई, रुग्णसेवा, भोजन आदींसाठी ४१ लाख रुपयांची तरदूत करण्यात आली; परंतु प्रत्यक्षात केवळ १० लाख रुपये खर्च क रण्यात आले.
* रुग्णवाहिका, शववाहिन्या खरेदी आणि दुरुस्तीसाठी २४ लाख रुपयांची तरतूद असताना केवळ ७ लाख रुपये खर्च करण्यात आले.
* ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य शिबिरासाठी ५० लाख रुपयांची तरदूत असताना केवळ ८ लाख ६९ हजार रुपये खर्च करण्यात आले.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-04-2016 at 05:18 IST