नीलेश पानमंद, लोकसत्ता

ठाणे : ठाणे लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीने अद्याप उमेदवार जाहीर केला नसला तरी युतीच्या नेत्यांनी मेळाव्याच्या माध्यमातून प्रचाराला सुरूवात केली आहे. शुक्रवारी ठाण्यात पार पडलेल्या अशाच एका युतीच्या मेळाव्याच्या व्यासपीठावर चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अवतरले आणि त्यांना पाहून सभागृहात एकच जल्लोष सुरू झाला. पण, काही वेळातच ते मोदी नसून त्यांच्यासारखे हुबेहूब दिसणारे विकास महंत हे असल्याचे कळताच कार्यकर्त्यांना आपल्या उत्साहावर आवर घालावा लागल्याचे चित्र दिसून आले.

ठाणे लोकसभा मतदार संघावर शिंदेंची शिवसेना आणि भाजप या दोन्ही मित्र पक्षांकडून दावे करण्यात येत आहेत. यामुळे या जागेचा तिढा अद्याप सुटू शकलेला नसून या जागेवर कोण उमेदवार असेल, याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहे. महायुतीच्या या जागेसाठी उमेदवार जाहीर केला नसेल तरी युतीच्या स्थानिक नेत्यांनी मात्र मेळाव्याच्या माध्यमातून प्रचाराला सुरुवात केली आहे. ठाणे आणि मीरा- भाईंदर शहरात मेळावा पार पडल्यानंतर घोडबंदर येथील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात युतीचा तिसरा मेळावा शुक्रवारी सायंकाळी पार पडला. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्याला महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आणखी वाचा-“श्रीकांत शिंदे यांच्या विरुद्धच्या नकारात्मक वातावरणामुळे उमेदवारी घोषित करण्यास टाळाटाळ”, शिवसेना युवा नेते वरूण सरदेसाई यांची टिपण्णी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या मेळाव्याच्या व्यासपीठावर व्यासपीठावर चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अवतरले आणि त्यांना पाहून सभागृहात एकच जल्लोष सुरू झाला. कार्यकर्त्यांनी मोदींच्या नावाने घोषणाबाजी केली. पण, काही वेळातच ते मोदी नसून त्यांच्यासारखे हुबेहूब दिसणारे विकास महंत हे असल्याचे कळताच कार्यकर्त्यांना आपल्या उत्साहाला आवर घालावा लागल्याचे चित्र दिसून आले. या मेळाव्यात विकास यांनी मोदी यांच्या शैलीत भाषण केले.