विद्याथ्यार्ंनी अवांतर वाचत राहावे -विनोद तावडे
अभ्यासक्रमाव्यतिरिक्त जेवढे वाचन कराल तेवढे समृद्ध होत जाल, असा सल्ला शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विद्यार्थ्यांना दिला. वाचन प्रेरणा दिनानिमित्त तावडे यांनी वसईतीेल शाळा आणि महाविद्यालयांना भेटी देऊन वाचन कट्टय़ाचे उद्घाटन केले. यावेळी विद्यार्थ्यांशीे संवाद साधताना मंत्रिपदाचीे झूल काढून ठेवत तावडे विद्यार्थ्यांमध्ये मिसळले होते.
भारताचे माजी राष्ट्रपतीे ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्मदिवस. हा दिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यानिमित्त वसईत जिल्हा परिषद शाळा आणि वर्तक महाविद्यालायने वाचन कट्टा स्थापन केला होता. सकाळी नालासोपाऱ्याच्या जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ मध्ये तावडे यांनी या वाचन कट्टय़ाचे उद्घाटन केले आणि मुलांमध्ये मिसळले. वाचनाचे महत्त्व सांगतेवेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी मिश्किल उत्तरे दिलीे. मंत्रिपदाचा आव न आणता तावडे वर्गातीेल बाकांवर बसून मुलांशीे संवाद साधत होते.
यानंतर तावडे यांनी वसईतीेल वर्तक महाविद्यालयातीेल वाचन कट्टय़ाचे उद्घाटन केले. एकमेकांना पुस्तके भेट द्या, असे आवाहन त्यांनी केले. मुले काय वाचतात हे त्यांनी जाणून घेतले आणि त्यांना त्याबद्दलचा आपला अनुभव सांगण्यास सांगितले. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाचीे आवड निर्माण करण्यासाठी शाळा आणि महाविद्यालयांनी प्रयत्न करण्याचीे गरज तावडे यांनी व्यक्त केलीे.