ठाणे : जिल्हा सामान्य रुग्णालयात शनिवारी पहाटे एक रुग्ण अस्वस्थ वाटू लागल्याने दाखल झाला. त्याच्यावर डॉक्टरांनी उपचार सुरु केले. परंतू, उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर, संतप्त झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना मारहाण करत, चाकूचा धाक दाखविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. परंतू, तो रुग्ण गंभीर परिस्थितीत असल्यामुळे त्याचा मृत्यू झाला, असे रुग्णालय प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. कर्मचाऱ्यांवर झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात आंदोलन केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वागळे इस्टेट भागात राहणाऱ्या एका व्यक्तीस शनिवारी पहाटे ४.३० च्या सुमारास अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्याचे नातेवाईक त्याला घेऊन ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात गेले. त्यावेळी रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी त्या रुग्णास दाखल करुन त्यावर उपचार सुरु केले. परंतू, उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकारामुळे मृत रुग्णाचे नातेवाईक संतप्त झाले. त्यांनी तेथे उपस्थित असलेल्या दिव्यांग कर्मचारी आणि परिचारक यांना मारहाण केली. तसेच चाकूचा धाक दाखविला.

हेही वाचा…डोंबिवली-तळोजा रस्त्यावर जखमीला मदत करून भामट्याने दुचाकी पळविली

या प्रकारामुळे सर्व कर्मचारी आणि डॉक्टर्स याच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा प्रकार घडला त्यावेळी ड्युटीवरील पोलीस याठिकाणी हजर नव्हते. मात्र, त्या रुग्णाला ज्यावेळी रुग्णालयात दाखल केले त्यावेळी त्याची परिस्थीती खूप गंभीर होती. त्यामुळेच त्याचा मृत्यू झाला असल्याचे रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले. तरीही, त्याच्या नातेवाईकांनी रुग्णालायातील कर्मचाऱ्यांना मारहाण केली. या घटनेचा निषेध करण्यासाठी शनिवारी सकाळी ११ वाजता डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले, असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. या घटनेच्या निमित्ताने पुन्हा एकदा सरकारी रुग्णालयातील डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Violent incident unfolds at civil hospital thane as patient s relatives attack staff doctors and staff did protest psg
Show comments