scorecardresearch

Video: आधी बोनेटवर नंतर फरफटत… प्रेमप्रकरणातून कल्याणमध्ये घडला धक्कादायक प्रकार

या प्रकरणाची व्हिडीओ क्लिप व्हायरल पोलिसांनी संबंधित मोटार चालकाचा वाहन क्रमांक सीसीटीव्हीच्या माध्यमातून मिळवला.

car kalyan viral
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी दाखल केली तक्रार

कल्याणमध्ये एका प्रेम प्रकरणावरून दोन तरुणांमध्ये झालेल्या संघर्षात एका तरुणाने दुसऱ्या तरुणाला आपल्या कारच्या बोनेटवर उचलून नेले असल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. फरपटत नेताना तरुण गाडीच्या चाकाजवळ पडला, पण सुदैवाने तो बचावला.

या प्रकरणाची दृश्य चित्रफित समाज माध्यमांमध्ये प्रसारित होताच, पोलिसांनी संबंधित मोटार चालकाचा वाहन क्रमांक सीसीटीव्हीच्या माध्यमातून मिळून त्याच्यावर खडकपाडा पोलीस ठाण्यात मोटार वाहन कायद्याने गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रवीण चौधरी असे मोटार चालकाचे नाव आहे. तो नवी मुंबईत राहतो. या घटनेतून बचावलेल्या तरुणाचे नाव त्रिवेश आहे. तो कल्याणमध्ये राहणार आहे.

पोलिसांनी चौधरीला अटक करून न्यायालयात हजर केले असता दहा हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावत त्याला सोडण्यात आले. प्रवीण चौधरी याचे कल्याणमध्ये राहणाऱ्या एका तरुणीसोबत प्रेम संबंध असल्याचा संशय त्रिवेशला होता. बुधवारी नवी मुंबईहून कारने प्रवीण त्या तरुणीला भेटण्यासाठी कल्याणमध्ये आल्याचे त्रिवेशला समजले. त्रिवेशने दुचाकीवरुन पाठलाग करत आधारवाडी चौकात प्रवीणला गाठले. त्यानंतर दुचाकीवरुन उतरत त्रिवेश कार समोर उभा राहिला. प्रविणशी वाद घालायला लागला. हा सर्व प्रकार एका नागरिकाने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

चौधरी आणि त्रिवेश यांचा वाद सुरु होता. चौधरी गाडी चालवत होता. त्रिवेश त्याच्या मोटारच्या दर्शनी भागात उभा होता. हा वाद सुरू असतानाच वाहतूक सिग्नल सुरु झाल्यानंतर चौधरीने गाडी सुरू केली. त्याने कारसमोर उभ्या असलेल्या त्रीवेशला काही अंतरापर्यंत फरफरट नेले. त्रिवेशने बोनेटला घट्ट पकडल्याने थोडक्यात बचावला शेवटी तो मागच्या चाकाजवळ पडला. तोपर्यंत चौधरीने गाडी सुसाट नेली. ही दृश्य चित्रफीत समाज माध्यमांवर प्रसारित झाली होती. त्यानंतर गुरुवारी वाहतूक पोलिसांनी कार चालक प्रवीण चौधरीवर गुन्हा दाखल केला.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Viral video kalyan love tringle fight man hit by car dragged on bonnet scsg