ठाणे : विठ्ठलभक्तीचा संगीत सोहळा अनुभवत ठाणेकर रसिक शनिवारी भक्तिरसात न्हाऊन निघाले. कार्तिक महिन्याचे औचित्य साधत ‘लोकसत्ता’ने आयोजित केलेल्या नामरंगी रंगले या मैफिलीला श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद लाभला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृहात हा सोहळा रसिकांच्या अभूतपूर्व गर्दीत रंगला. सारेगमप लिटिल चॅम्पियन्सच्या मंचावरून प्रेक्षकांची मने जिंकणारे प्रसिद्ध गायक प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांच्या सूरमयी स्वरांनी नाटय़गृहातील वातावरण मंत्रमुग्ध झाले होते.

या मैफिलीची सुरुवात ‘जय जय रामकृष्ण हरी’ या अभंगाने झाली आणि उत्तरोत्तर हा कार्यक्रम रंगत गेला. या कार्यक्रमाला केसरी टूर्सचे अभिषेक ठाकूर, ब्रह्मविद्या साधक संघ चॅरिटेबल ट्रस्टच्या रुचिरा गोडबोले आणि पुराणिक बिल्डर्स समूहाचे गोपाल पुराणिक हे उपस्थित होते. ‘मन हे राम रंगी रंगले’,  ‘उगवला चंद्र पुनवेचा’, ‘हे श्याम सुंदर’, ‘माझे जीवन गाणे’, ‘टाळ मृदुंग दक्षिणेत’, ‘अवघे गरजे पंढरपूर’ अशा विविध गीतांनी वातावरण प्रसन्न झाले. करोनाकाळानंतर प्रथमच प्रत्यक्ष झालेल्या भक्तिगीतांच्या या मैफलीमुळे पांडुरंगाच्या वारीत सहभागी झाल्याचे भाव प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत होते. विठ्ठलाच्या गजरात समस्त प्रेक्षकवर्ग रमून गेले होते. प्रत्येक गाण्यापूर्वी निवेदनाच्या माध्यमातून त्या गाण्याचा संदर्भ स्पष्ट करत या सुरेल मैफिलीचे निवेदन निवेदक कुणाल रेगे यांनी उत्तमरीत्या पार पाडले. करोनानिर्बंध शिथिल झाल्यानंतर प्रथमच ‘लोकसत्ता’ने या भव्य संगीत कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हा संपूर्ण कार्यक्रम करोनासंबंधी शासनाने आखून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून पार पडला.

प्रायोजक

मुख्य प्रायोजक

केसरी टूर्स

सहप्रायोजक

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, ब्रह्मविद्या साधक संघ आणि  पुराणिक बिल्डर्स

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vitthal bhakti music festival organized by loksatta zws
First published on: 28-11-2021 at 03:23 IST