कल्याण : उल्हासनगर जवळील माणेरे गावात विठ्ठलवाडी पोलिसांनी अचानक छापा मारून बेकायदा हुक्का पार्लर चालविणाऱ्या चालकासह या पार्लरमध्ये हुक्का सेवन करण्यासाठी आलेल्या २३ ते २६ वयोगटातील ग्राहकांवर गुन्हा दाखल केला. बुधवारी रात्री बारा वाजण्याच्या दरम्यान विठ्ठलवाडी पोलिसांनी ही कारवाई केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उल्हासनगर जवळील माणेरे गाव हद्दीत राहुल कन्स्ट्रक्शनच्या जवळ आणि अर्जुन भोईर यांच्या पीठाच्या चक्की परिसरात लक्ष्मीबाई भोईर चाळीत एक इसम हुक्का पार्लर चालवित आहे. येथे हुक्का सेवन करण्यासाठी ग्राहकांची विशेषता तरूणांची अधिक गर्दी रात्रीच्या वेळेत होत असल्याची गुप्त माहिती विठ्ठलवाडी पोलिसांना मिळाली होती. या माहितीप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांच्या आदेशावरून साहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षल कुलकर्णी, उपनिरीक्षक बी. आर. दराडे आणि पोलीस पथकाने रात्रीच सोबत पंंच घेऊन माणेरे गाव गाठले.
माणेरे गावातील लक्ष्मीबाई नाथा भोईर चाळीत पोहचल्यावर तेथे त्यांना हुक्का पार्लर सुरू असल्याचे दिसले. हुक्का पार्लर चालक राकेश नाथा भोईर (२६) यांनी आपण हा हुक्का पार्लर चालवित असल्याची माहिती पोलिसांना दिली. हुक्का पार्लर चालविण्याचा परवाना जवळ नसल्याचे भोईर यांनी पोलिसांना सांंगितले. पार्लरमध्ये सीलबंद तंबाखुमिश्रीत हुक्क्याचे फ्लेवर, हुक्का ओढण्यासाठीची नळकांडी आढळून आली. पोलिसांनी हे सर्व साहित्य जप्त केले.

also read

वैद्यकीय पदवी जवळ नसताना रुग्णसेवा देणाऱ्या उल्हासनगरमधील डाॅक्टरवर गुन्हा

बहुतांशी तरूण माणेरे गाव, कैलास काॅलनी, गायकवाडा पाडा भागातील रहिवासी आहेत. रात्रीच्या वेळेत दररोज या भागात हुक्का पार्लरमध्ये तरूणांची गर्दी असायची. या हुक्का पार्लरमुळे परिसरातील रहिवासी त्रस्त होते. या कारवाईमुळे रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. राज्य सिंगारेट व इतर तंबाखु उत्पादने कायद्याने हुक्का पार्लर चालक राकेश भोईर यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षल कुलकर्णी तपास करत आहेत. कल्याण, डोंबिवली शहराच्या परिसरात निर्जन ठिकाणी, खाडी किनारी भागात अशी हुक्का पार्लर रात्रीच्या वेळेत चालविली जात असल्याच्या तक्रारी आहेत.