लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

ठाणे : विधानसभा निवडणूकीच्या आधीपासून राष्ट्रवादी (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्यातील आरोपप्रत्यारोपाची लढाई निवडणूकीनंतरही सुरूच असल्याचे चित्र आहे. हा वाद इतका टोकाला गेला आहे की, दोन्ही नेत्यांनी बापाचा उल्लेख करत एकमेकांवर टीका केली आहे. या वादात आता आव्हाड समर्थकांनीही उडी घेतल्याने तो आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.

district administration decision to crack down on extortionists along with making the district industry friendly
उद्योगस्नेही जिल्हा करण्याबरोबरच खंडणीखोरांना चाप लावण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा ठोस निर्णय
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
BJP started journey to become superpower with record target of registering 1.5 crore workers
भाजप ‘समृद्धी’ महामार्गाने ‘शत प्रतिशत’कडे
santosh deshmukh latest news in marathi
‘‘संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना फाशी द्या”, वाशीममध्ये सर्वपक्षीय मोर्चात मूक आक्रोश
NCP Sharad Pawar Group Politics
NCP : ‘प्रदेशाध्यक्षांसह सर्वांचे राजीनामे घ्या’, शरद पवारांसमोरच कार्यकर्त्याची जयंत पाटलांच्या राजीनाम्याची मागणी, नेमकं काय घडलं?
Ajit Pawar and Suresh Dhas
Ajit Pawar : सुरेश धस यांनी उल्लेख केलेली मुन्नी कोण? विचारताच अजित पवार संतापून म्हणाले, “असल्या फाल्तू…”
bjp membership registration campaign target to add 50 lakh new members in maharashtra
भाजप सदस्यनोंदणी ! ‘ हे ‘ आमदार अव्वल तर ‘ हे ‘ पिछाडीवर
Gulabrao Deokar , BJP, Ajit Pawar group, Ajit Pawar ,
गुलाबराव देवकर यांची पाऊले आता भाजपकडे, अजित पवार गटात पक्षप्रवेशास विरोध

राष्ट्रवादी पक्षातील फुटीनंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवार यांची साथ दिली. तर, त्यांचे एकेकाळचे समर्थक असलेले आनंद परांजपे आणि नजीब मुल्ला यांनी अजित पवार यांची साथ दिली. तेव्हापासून आव्हाड विरुद्ध परांजपे आणि मुल्ला असा सामना रंगला आहे. आव्हाड यांच्याविरोधात मुल्ला यांनी निवडणूक लढवली. या निवडणुकी आधीपासून जितेंद्र आव्हाड आणि आनंद परांजपे यांच्यातील आरोपप्रत्यारोपाची लढाई सुरू असून ती निवडणूकीनंतरही थांबलेली नसल्याचे चित्र आहे.

आणखी वाचा-“मी डोंबिवलीतच, दिल्लीला गेलेलो नाही”, मंत्री रवींद्र चव्हाण यांचे दिल्लीवारीवरच्या अफवांवर स्पष्टीकरण

जितेंद्र आव्हाड यांनी शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना आनंद परांजपे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली होती. “मी दहा वेळा पक्ष बदलत नाही, कारण माझा बाप एकच आहे” असे आव्हाड म्हणाले होते. त्यास आनंद परांजपे यांनी प्रतिउत्तर देत आव्हाड यांच्यावर आरोप केले होते. ” माझे वडील एकच आहेत. त्यांचे नाव प्रकाश विश्वनाथ परांजपे. मी मरेपर्यंत माझ्या वडिलांचे नाव प्रकाश विश्वनाथ परांजपे हेच राहील. पण आपण मात्र ज्यांना विठ्ठल आणि बाप म्हणतात त्यांना किती वेळा खोटे बोलले आहे. या अनेक क्षणाचे आम्ही साक्षीदार आहेत. गणेश नाईक, वसंत डावखरे यांच्या बाबत कितीतरी वेळा खोटं फिडींग आपण शरद पवार साहेबांना दिले. किती लोक आपल्या खोट्या फिडींगमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे जिल्ह्यातून सोडून गेले ही लिस्ट खूप मोठी आहे, असे आनंद परांजपे म्हणाले. जितेंद्र आव्हाड यांना शॉर्ट टर्म मेमरी लॉस झालेला आहे, या निष्कर्षात मी आलो आहे, अशी टीकाही त्यांनी केली होती.

आणखी वाचा-मनसेचे नेते अविनाश जाधव यांचा राजिनामा

या वादात आता आव्हाड समर्थक आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट ) सरचिटणीस अँड. कैलास हावळे यांनी उडी घेत परांजपे यांच्यावर टीका केली आहे. ” जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केल्यावर तुम्हाला प्रसिद्ध मिळते , वरिष्ठ खूश होतात एखादं महामंडळ किंवा एखादं महत्त्वाचं पद पदरात पडेल या आशेने तुम्ही जितेंद्र आव्हाड यांच्यावर वारंवार टीका करतात. त्यामुळे खरे शॉर्ट टर्म मेमरी लॉस हे तुमच्या सारखेच पक्ष बदलू असू शकतात.” असेही ते म्हणाले. यामुळे हा वाद वाढतानाच दिसून येत आहे.

Story img Loader