ठाणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठीची प्रभाग रचना आणि आरक्षणाची सोडत शुक्रवारी जाहीर करण्यात आली. एकूण १३१ नगरसेवक असलेल्या या सोडतीमध्ये ३२ प्रभाग हे चार सदस्यीय असून १ प्रभाग हा ३ सदस्यीय आहे. आजच्या सोडतीमुळे कुठल्याच पक्षाला विशेष फटका बसणार नसून केवळ शिवसेनेसमोर उमेदवार निवडीचे आव्हान असणार आहे. लोकसंख्या वाढीचे नवे विक्रम प्रस्थापित करणाऱ्या दिवा परिसरातून यंदा तीन पॅनलमधून ११ नगरसेवक निवडून येणार आहेत. शिवसेना आणि भाजपचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या जुन्या ठाणे शहरातून यंदा २० नगरसेवक महापालिकेतून निवडून जातील.

एकूण पॅनल : ३३
एकूण नगरसेवक : १३१
प्रत्येक पेनल : ४ नगरसेवक
(फक्त दिव्यातील २९ क्रमांकाचा खर्डी, डवले, पडले गाव, देसाई, खीडकाळी, डायघर, कौसा तलाव हा पेनल ३ नगरसेवक)
—————-
घोडबंदर : २० नगरसेवक (२ वाढ)
वागळे कोपरी : ३२ नगरसेवक (१० कमी)
कळवा : १६ नगरसेवक
मुंब्रा : २० नगरसेवक
(कळवा + मुँब्रा= ३६ (४ वाढ)
दिवा : ११ नगरसेवक (९ वाढ)
वर्तक नगर : १२ नगरसेवक (४ वाढ)
शहर (नौपाडा, पाचपाखाडी, घंटाळी, टेंभी नाका) : १२ नगरसेवक
जुना ठाणे : ८ नगरसेवक
————–
एकूण लोकसंख्या – १८,४१,४८८
अनुसूचित जाती – १,२६,००३
अनुसूचित जमती – ४२,६९८
—————-
महापालिका निवडणूक २०१७ पदांचे आरक्षण
एकूण – १३१ (६६ महिला)
अनुसूचित जाती – ९ (महिला ५)
अनुसूचित जमाती – ३ (महिला २)
नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग – ३५ ( महिला १८)
सर्वसाधारण – ८४ (महिला ४१)
————-
अनुसूचित जातीची लोकसंख्या अधिक असलेले प्रभाग
प्रभाग क्र. – ३ (अ) (मानपाडा, मनोरमानगर, आझादनगर)
प्रभाग क्र. – ६ (अ) (लोकमान्यनगर, शास्त्रीनगर, परेरानगर, रामबाग)
प्रभाग क्र. ७ (अ) – वर्तनकगर, ग्लॅस्लो कंपनी, रेमंड, समतानगर, ओसवाल पार्क
प्रभाग क्र . ९ (अ) – पारसिकनगर, संघवी हिल्स, आनंद विहार, सह्याद्री, खारेगाव प्रभाग क्र. १५ (अ) – इंदिरानगर, साठेनगर, आंबेवाडी, जय भवानी नगर
प्रभाग क्र . १६ (अ) – श्रीनगर, वारलीपाडा, रामनगर, कैलाशनगर
प्रभाग क्र.- २२ (सेंट्रल जेल, महागिरी, खारकर अळी, चेंदणी कोळीवाडा)
प्रभाग क्र. – २४ अ (विटावा, आनंदनगर, भोलानगर)
प्रभाग क्र . – २८ अ (आगासन, दातीवली, भोलेनाथ नगर)
—————–
अनुसुचित जमातीची लोकसंख्या जास्त असलेले प्रभाग – प्रभाग
क्र. १ अ (ओवळे, कासारवडवली, भार्इंदर पाडा, कावेसर)
प्रभाग क्र. २ अ (हिरानंदानी इस्टेट, पातलीपाडा, ब्रम्हांड, अकबर कॅम्प)
प्रभाग क्र. ५ अ (पवारनगर, वसंत विहार, शिवाईनगर, येऊर)

nilesh rane paid 25 lakhs to pune municipal corporation to settle the tax dues
पुणे: निलेश राणे यांच्यासाठी महापालिकेच्या पायघड्या; अवघे २५ लाख भरल्यानंतर मिळकतकराची थकबाकी शून्य
Fraud with trader dhule
पंजाबचा व्यापारी अन धुळ्याचे पोलीस
Pimpri mnc cut trees
धक्कादायक : पिंपरी महापालिका करणार १४२ झाडांची कत्तल, जाणून घ्या काय आहे प्रकरण
pune rural police, Saswad, Planting Opium, Onion Field, arrest, Kodit Village, crime news,
पुणे : सासवड परिसरात कांद्याच्या शेतीत अफूची लागवड