scorecardresearch

ठाणे : प्रभाग कोणाचा बालेकिल्ला वैगरे नसतो; राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा शिवसेनेला टोला

प्रभाग कोणाचा बालेकिल्ला वैगरे नसतो, लोकांच्या मनात जावे लागते, धर्मवीर आनंद दिघे असतानाही या विभागातून स्वर्गीय रामचंद्र ठाकूर कधीच निवडणूक हरले नव्हते, असा टोला राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.

ठाणे : प्रभाग कोणाचा बालेकिल्ला वैगरे नसतो; राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा शिवसेनेला टोला
जितेंद्र आव्हाड

ठाणे : प्रभाग कोणाचा बालेकिल्ला वैगरे नसतो, लोकांच्या मनात जावे लागते, धर्मवीर आनंद दिघे असतानाही या विभागातून स्वर्गीय रामचंद्र ठाकूर कधीच निवडणूक हरले नव्हते, असा टोला राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. ठाकूर यांच्या पश्चात जेष्ठ माजी नगरसेवक हणमंत जगदाळे हे त्यांचा वारसा पुढे चालवत असून त्याचबरोबर नागरिकांना अपेक्षित असणारे काम करत आहेत, असेही ते म्हणाले.

हेही वाचा : Maharashtra News Live : महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीचा आढावा, जाणून घ्या एकाच क्लिकवर!

हेही वाचा : काटई-बदलापूर रोडवर अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत रहिवाशाचा मृत्यू

 माजी विरोधी पक्षनेते,जेष्ठ माजी नगरसेवक हणमंत जगदाळे यांच्या ठाण्यातील शास्त्रीनगर-सहकारनगर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाचे उदघाट्न जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते बुधवारी झाले. त्यावेळी ते बोलत होते. निवडणूका येतात आणि जातात. पण, जनसामान्यांच्या सुख दुःखात सामील होणे, हे राजकीय पक्षाच्या कार्यकर्ताच काम आहे आणि तशाप्रकारचे काम राष्ट्रवादीचे कार्यकर्ते करत असतात. ते नागरिकांच्या समस्या – प्रश्न  सोडवत असतात. हि सर्व कामे करण्यासाठी कार्यालय असावे, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन करण्यात आल्याचे ते म्हणाले. स्वर्गीय रामचंद्र ठाकूर यांनी या विभागाचे प्रतिनिधित्व केले. धर्मवीर आनंद दिघे असतानाही रामचंद्र ठाकूर या विभागातून  कधीच निवडणूक हरले नव्हते. त्यामुळे प्रभाग कोणाचे बालेकिल्ला वैगरे नसतात. लोकांच्या मनात जावे लागते, असेही ते म्हणाले.

शास्त्रीनगर प्रभागातून निवडून आल्यांनतर गेल्या पाच वर्षात या विभागाचा अभ्यास करून प्रश्न समस्या समजून घेऊन या विभागातील काही अंशी समस्या सोडवण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीच्या माध्यमातून करण्यात आला असून अजून देखील काही समस्या आहेत, त्या आगामी काळात सोडवल्या जातील. या विभागाचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने आम्ही पावले उचलणार असल्याचे जेष्ठ नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी यावेळी सांगितले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे, माजी नगरसेविका राधाबाई जाधवर, माजी नगरसेवक दिंगबर ठाकूर,माजी परिवहन समिती सदस्य संतोष पाटील,माजी नगरसेविका वनिता घुगरे, रेवती ठाकूर,सुधाकर नाईक,संतोष ठाकूर,राजा जाधवर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.