scorecardresearch

Premium

डोंबिवली एमआयडीसीत सोसायटी प्रवेशव्दारांवर राडारोडा, रहिवासी हैराण

एमआयडीसीतील मुख्य वर्दळीच्या रस्ते, सोसायटी, बंगल्यांच्या प्रवेशव्दारावर राडारोडा रात्रीच्या वेळेत आणून टाकण्याचे प्रमाण वाढल्याने एमआयडीसीतील रहिवासी संतप्त आहेत.

waste on road in dombivli
एमआयडीसीतील सुदर्शननगरमध्ये सोसायटीच्या प्रवेशव्दारावरील राडारोडा.(फोटो सौजन्य- लोकसत्ता टीम)

लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली: येथील एमआयडीसीतील मुख्य वर्दळीच्या रस्ते, सोसायटी, बंगल्यांच्या प्रवेशव्दारावर राडारोडा रात्रीच्या वेळेत आणून टाकण्याचे प्रमाण वाढल्याने एमआयडीसीतील रहिवासी संतप्त आहेत. एकीकडे संथगती काँक्रीट रस्त्यांनी रहिवासी हैराण असताना आता काही अज्ञात व्यक्ति मुख्य वर्दळीच्या रस्त्यांवर राडारोडा आणून टाकत असल्याने एमआयडीसी अधिकाऱ्यांनी संबंधिताचा शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे.

virat kohli
विराट कोहलीची विश्वचषकातून माघार? तातडीने मुंबईला रवाना झाल्याने चर्चांना उधाण
kitchen tips in marathi how to make roti with tea strainer kitchen jugaad video viral
Kitchen Jugaad: चपातीवर चहाची गाळणी नक्की फिरवा; अशी कमाल होईल की तुम्ही विचारही केला नसेल, काय ते VIDEO मध्ये पाहा
Sharad Pawar NCP
“ते सहसा माझ्या शब्दाला नकार देत नाहीत”; शरद पवारांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा, म्हणाले…
उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीने कोणते कपडे घालावेत, हे ठरवणारे तुम्ही कोण?

सुदर्शननगरमध्ये गेल्या काही महिन्यांपासून काँक्रीट रस्ते कामांसाठी रस्ता खोदून ठेवण्यात आला आहे. पदपथ, पाण्याच्या वाहिन्या, संथगती कामे यामुळे या भागातील रहिवाशी हैराण आहेत. याच भागातील काही रस्त्यांवर मागील काही दिवसांपासून पथदिवे बंद आहेत. रात्रीच्या वेळेत नागरिकांना अंधारातून येजा करावी लागते. हा त्रास सहन करत असताना काही अज्ञात व्यक्ति रात्रीच्या वेळेत टेम्पोने इमारत, घरातील लाद्या, सिमेंट तुकड्यांचा राडारोडा एमआयडीसीतील रस्ते, सोसायट्यांची प्रवेशव्दार, गटारांवर आणून टाकत आहेत.

आणखी वाचा-नेवाळी नाका कारवाई: कल्याण पूर्वेतील नेवाळी नाका परिसरातील बेकायदा बांधकामे भुईसपाट

शनिवारी सुदर्शननगर मधील श्री मंजुनाथ सोसायटीच्या प्रवेशव्दारावर अज्ञात व्यक्तिने टेम्पोतून राडारोडा आणून सोसायटीच्या प्रवेशव्दारावर आणून टाकला आहे. या राडारोड्याची धूळ वारा आला की परिसरात पसरते. पाऊस सुरू होईल त्यावेळी राडारोड्याचा चिखल परिसरात पसरुन या रस्त्यावरुन चालणे मुश्किल होईल, असे या भागातील रहिवाशांनी सांगितले.

श्री मंजुनाथ सोसायटीतील रहिवाशांनी हा राडारोडा तात्काळ उचलण्याची मागणी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे. एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांचे एमआयडीसी हद्दीतील गटारे, रस्ते याकडे लक्ष नसल्याने त्याचा त्रास रहिवाशांना होत आहे, अशा तक्रारी रहिवाशांनी केल्या.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Waste at society entrances in dombivli midc residents irritate mrj

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×