मीरा-भाईंदरमधील गृहनिर्माण सोसायटय़ांकडून प्रतिसाद नाही
ओला व सुका कचरा वेगळा करण्याच्या मोहिमेची प्रशासनाकडून प्रभावीपणे प्रसिद्धी न झाल्याने तसेच रहिवासी सोसायटय़ांकडून त्याला प्रतिसाद न मिळाल्याने ही मोहीम फक्त कागदावरच राहिल्याचे स्पष्ट झाले आहे. कचऱ्याचे वर्गीकरण न करणाऱ्या सोसायटय़ांचे पाणी तोडण्याचा इशारा महापालिकेने दिला होता. परंतु शहरातली सध्याची पाण्याची परिस्थिती पहाता या कारवाईने लोकक्षोभाला सामोरे जावे लागेल या भीतीने प्रशासनाने सध्या शांत राहाण्याची भूमिका घेतली आहे.
घनकचरा व्यवस्थापन नियमानुसार ओला व सुका कचरा वेगळा करणे बंधनकारक आहे. परंतु महापालिकेनेही आजपर्यंत हा बाब गांभीर्याने घेतली नव्हती. परंतु उत्तन येथील घनकचरा प्रकल्प बंद पडल्यानंतर दररोज जमा होणारा कचरा प्रशासनाची डोकेदुखी ठरू लागला आहे. कचऱ्याचे वर्गीकरण केल्यास प्रक्रिया करायच्या कचऱ्याचे प्रमाण अध्र्यावर येणार असल्याने आता कचऱ्याचे वर्गीकरण सक्तीचे करण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे. यासाठी ओला व सुका कचरा दोन वेगळ्या रंगाच्या डब्यांमध्ये साठविण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. सुरुवातीला विनंती, नंतर इशारा व तरीही कचरा वेगळा केली नाही तर सोसाटीची नळ जोडणी खंडित करण्याची आक्रमक भुमिका प्रशासनाकडून घेण्यात आली आहे. एक मार्च पासून कचरा वेगळा स्विकारण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. परंतू ही बाब सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचलेलीच नाही. कचऱ्याचे वर्गीकरण करा असे आवाहन करणारी पत्रके महापालिकेने काढली आहेत मात्र ही पत्रके सोसायटय़ांपर्यंत पोचलीच नाहित . महापालिकेची प्रचार यंत्रणा कमकुवत असल्याने जनजागृती अभावी सोसायटय़ांनी कचऱ्याचे वर्गीकरण केलेच नाही. त्यामुळे आजही कचरा एकत्रितपणेच गोळा केला जात आहे.

सध्याची शहरातील वातावरण निवळेपर्यंत कचऱ्याचे वर्गीकरण करण्याची सक्ती केली जाणार नाही. मात्र परिस्थिती सुधारताच पुन्हा एकदा मोहीम व्यापक स्वरुपात हाती घेतली जाईल. कचरा वर्गीकरणाचे महत्त्व प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध उपाय योजनाही राबविण्यात येतील.
– डॉ. संभाजी पानपट्टे, उपायुक्त, मीरा-भाईंदर

axis mutual fund, axis multicap fund
अशी होते म्युचुअल फंडाची ‘अल्फा’निर्मिती
corruption, neutral vigilance department,
‘तटस्थ दक्षता विभाग’ असल्याशिवाय प्रशासनातील भ्रष्टाचार थांबेल कसा?
UPSC ची तयारी: भारतीय राज्यव्यवस्था केंद्रराज्य संबंध, घटनादुरुस्ती
toll plaza
विश्लेषण : भविष्यात टोलनाके बंद होणार? कशी असेल GPS आधारित नवी यंत्रणा?