ठाणे : महापालिका क्षेत्राला पाणी पुरवठा करणाऱ्या स्टेम प्राधिकरणाकडून दैनंदिन देखभाल दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार असून या कामांमुळे बुधवारपासून पुढील ३६ तासांसाठी स्टेम प्राधिकरणाकडून ठाणे शहराला होणारा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. या बंदमुळे पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याने ठाणेकरांपुढे पाणी टंचाईचे संकट उभे राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, पाणी पुरवठा बंद असलेल्या भागात महापालिकेच्या स्वत:च्या योजनेतून पाणी पुरवठा करण्याचे नियोजन प्रशासनाने केले असून विभागवार करण्यात आलेल्या या नियोजनामुळे नागरिकांना ३६ ऐवजी १२ तास पाणी मिळणार नसल्याचा दावा पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने केला आहे.

हेही वाचा >>>ठाणे : सात तासानंतर वाहतूक कोंडी सुटली

bmc, mumbai municipal corporation, Undertake Rs 209 Crore Drainage Project, Prevent Flooding, Andheri Subway, milan subway, bmc drainage project, mumbai monsoon, mumbai waterlogging, mumbai news,
अंधेरी सब वे पूरमुक्त करण्यासाठी आणखी २०९ कोटी, किमान तीन वर्षे लागणार
Why three new swimming pools will start in Mumbai How to plan the municipal corporation
पाण्याचा तुटवडा, तरीही मुंबईत तीन नवे जलतरण तलाव का सुरू होणार? महापालिकेचे नियोजन कसे?
no water supply in most parts of Pune city on thursday due to repair works
पुणे : शहरात अघोषित पाणीकपात? पेठांचा भागवगळता उर्वरित शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद
ow pressure water supply
दोन दिवस कमी दाबाने पाणी, मोरबे मुख्य जलवाहिनीवर आज १० तास देखभाल दुरुस्ती; नवी मुंबईसह कामोठे, खारघरलाही फटका

ठाणे महापालिका क्षेत्रात चार स्त्रोतांमार्फत दररोज ५८५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यात महापालिकेच्या स्वत:च्या योजनेतून २५० दशलक्षलीटर, स्टेम प्राधिकरणाकडून ११५ दशलक्षलीटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून १३५ दशलक्षलीटर आणि मुंबई महापालिकेकडून ८५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यामुळे हे सर्वच स्त्रोत शहरातील पाणी पुरवठ्याच्या दृष्टीकोनातून महत्वाचे मानले जातात. यापैकी एका स्त्रोताचा पाणी पुरवठा दुरुस्ती कामासाठी बंद असेल तर शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण होते. अशीच परिस्थिती येत्या बुधवारपासून शहरात निर्माण होण्याची शक्यता आहे. स्टेम प्राधिकरणाच्या योजनेमधील दैनंदिन देखभाल दुरूस्तीच्या कामासाठी बुधवार, १४ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते गुरूवार रात्री ९ असा ३६ तास पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. यामुळे स्टेमकडून ठाणे महापालिकेला होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या बंदमुळे ठाणेकरांचे हाल होण्याची शक्यता लक्षात घेऊन ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने या कालावधीत स्वत:च्या योजनेतील पाणी पुरवठा सुरु ठेवून त्याचे विभागवार नियोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. या नियोजनामुळे नागरिकांना ३६ ऐवजी १२ तास पाणी मिळणार नसल्याचा दावा पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने केला आहे.

हेही वाचा >>>VIDEO: “यांनी महाराष्ट्रात आग लावण्याचं काम केलं, कारण…”, शाईफेक प्रकरणावर जितेंद्र आव्हाडांची संतप्त प्रतिक्रिया

ठाणेकरांना ३६ ऐवजी १२ तासच पाणी मिळणार नाही
नव्या नियोजनानुसार बुधवार १४ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते रात्री ९ या वे‌ळेत घोडबंदर रोड, माजिवडा-मानपाडा, ब्रह्मांड, विजयनगरी, पातलीपाडा, साकेतचे नवीन कनेक्शन या भागातील पाणीपुरवठा १२ तासांसाठी बंद राहणार आहे. बुधवार रात्री ९ ते गुरूवार सकाळी ९ वाजेपर्यंत गांधीनगर, सुरकुरपाडा, उन्नती, सिद्धांचल, समतानगर, सिध्देश्वर, दोस्ती, आकृती, जॉन्सन, इटर्निटी या भागात १२ तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच गुरूवार सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यत इंदिरानगर, लोकमान्यनगर, श्रीनगर, रामनगर, मुंब्रा व कळव्याचा काही भाग, खारेगाव, रुस्तमजी, साकेत, जेल, ऋतूपार्क या भागात १२ तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे, असे पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने सांगितले आहे.