ठाणे : औरंगजेब महाराष्ट्रावर चाल करून आला होता. त्याने मंदिरे तोडली, माता-भगिनींवर अत्याचार केले होते. धर्मवीर संभाजी महाराजांचा अनन्वित छळ केला, अशा औरंगजेबाच्या आठवणी आणि निशाणी महाराष्ट्रात कशाला हवी अशी शिवभक्तांची भावना आहे, हीच भावना माझी देखील आहे. शिवभक्तांच्या भावनांचा आदर केला पाहिजे. औरंगजेबाचे समर्थन कोणीही करता कामा नये. तो देशद्रोही होता असे परखड मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रविवारी सायंकाळी एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी काँग्रेसवरही टीका केली. औरंगजेब महाराष्ट्रावर चाल करून आला होता. मंदिरे तोडली, माता-भगिनींवर अत्याचार केले होते. धर्मवीर संभाजी महाराजांचा अनन्वित छळ केला. संभाजी महारांनी प्राणांचे बलिदान केले. परंतु औरंगजेबासमोर झुकले नाही. औरंगजेबाची आठवणी आणि निशाणी महाराष्ट्रात कशाला हवी अशी शिवभक्तांची भावना आहे, अशी भावना माझी देखील आहे. या भावनांचा आदर केला पाहिजे. जो देशभक्त असेल त्यांनी औरंगजेबाच्या कबरीचे उदात्तीकरण करता कामा नये. औरंगजेबाचे समर्थन कोणीही करता कामा नये. तो देशद्रोही होता असे एकनाथ शिंदे म्हणाले.

जे औरंगजेबाचे उदात्तीकरण करत आहे. त्यांचा निषेध करायला हवा. त्याने आपल्या देवताचा छळ केला. औरंगजेबाचे समर्थन करणाऱ्यांना महाराष्ट्राची जनता माफ करणार नाही असेही ते म्हणाले. काँग्रेसने छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास वाचावा, छावा सिनेमा पाहावा आणि नंतर उदात्तीकरणाचा विचार करावा असेही ते म्हणाले.

जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार मिळाल्याबद्दल शिंदे म्हणाले की, हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नाही, तर वारकऱ्यांचा, धारकऱ्यांचा, शेतकऱ्यांचा, लाडक्या बहिणी आणि भावांचा पुरस्कार आहे. मागील अडीच तीन वर्षांमध्ये आम्ही महाराष्ट्रामध्ये विकासाचे काम केले. लोकाभिमुख, कल्याणकारी योजना आणल्या. देहू, आळंदी तसेच तीर्थक्षेत्रामध्ये आम्ही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. पंढरपूरच्या वारकऱ्यांच्या सोयी-सुविधांचे निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.