scorecardresearch

ठाण्यात मुलांचे पळविणाऱ्या टोळीच्या अफवेने एका महिलेला बेदम मारहाण

कळवा पोलिसांनी तात्काळ महिलेला छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

ठाण्यात मुलांचे पळविणाऱ्या टोळीच्या अफवेने एका महिलेला बेदम मारहाण
( संग्रहित छायचित्र )

कळवा येथील विटावा भागात एका महिलेला बेदम मारहाण करण्यात आल्याचा प्रकार गुरूवारी रात्री उघडकीस आला. या महिलेला मुले पळविणाऱ्या टोळीतील असल्याच्या अफवेतून मारहाण झाली आहे. कळवा पोलिसांनी तिला उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल केले आहे.विटावा येथील सुर्यनगर परिसरातून महिला जात असताना परिसरातील काही महिलांनी तिला अडविले.

तिच्याकडून कोणतेही उत्तर मिळत नसल्याने मुले पळविणारी टोळीच्या अफवेतून महिलांनी तिला मारहाण करत पोलीस ठाण्यात नेले. कळवा पोलिसांनी तात्काळ तिला छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान कोणत्याही मुलाचे अपहरण झाले नव्हते. तसेच कोणीही महिलेविरोधात तक्रार दिली नाही. महिलेला अफवेतून मारहाण झाली अशी माहिती पोलिसांनी दिली.

मराठीतील सर्व ठाणे न्यूज ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Woman brutally beaten up thane rumor gang abducting children tmb 01

ताज्या बातम्या