scorecardresearch

Video : दर्शनासाठी आली आणि चोरी करून गेली; महिलेकडून मंदिरात चोरी, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात महिला कैद

बरनाथ पश्चिम पोलिसांनी अज्ञात महिलेविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस सध्या सीसीटीव्हीच्या आधारे या महिलेचा शोध घेत आहेत.

woman stole the goddess s necklace in ambernath
कालिका मातेच्या गळ्यातील सोन्याचा हार चोरून नेताना महिला

अंबरनाथः अंबरनाथमध्ये मंदिरात दर्शनासाठी आलेल्या महिलेने कालिका मातेच्या गळ्यातील सोन्याचा हार चोरून नेल्याची घटना घडली समोर आली आहे. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. त्यानंतर मंदिराच्या पुजाऱ्यांच्या ही बाब लक्षात आल्याने सर्व प्रकार उलगडला. अंबरनाथ पश्चिमेच्या चिंचपाडा भागात कालिका मातेचे मंदिर आहे.

कालिका मातेच्या गळ्यातील सोन्याचा हार चोरून नेताना महिला

हेही वाचा >>> Video : ‘दारु का प्यायलास’ विचारले म्हणून आंबिवलीत डॉक्टरला माराहण

सोमवारी सकाळी ९ च्या सुमारास निळ्या रंगाचे कपडे परिधान केलेली एक महिला दर्शन घेण्याच्या बहाण्याने या मंदिरात आली. त्यानंतर तिने गाभाऱ्यासमोर असलेल्या सुरक्षा रेलिंगवरून आत जात थेट देवीच्या गळ्यातला सोन्याचा हार चोरला. हार घेऊन महिलेने पोबारा केला.  काही वेळाने मंदिराचे पुजारी नवीन शेट्टी हे तिथे आल्यानंतर देवीच्या गळ्यातील हार फुले अस्ताव्यस्त असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी जवळ जाऊन तपासले असता देवीच्या गळ्यातला सोन्याचा हार गहाळ असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी सीसीटीव्ही फुटेज चेक करताच त्यातमध्ये दर्शनासाठी आलेल्या या महिलेने देवीचा हार चोरल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी नवीन शेट्टी यांच्या तक्रारीनुसार अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी अज्ञात महिलेविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस सध्या सीसीटीव्हीच्या आधारे या महिलेचा शोध घेत आहेत.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-03-2023 at 17:15 IST