डोंबिवली- मागील पाच वर्षापासून आपल्याकडे शरीरसुखाची मागणी करणाऱा डोंबिवली भाजपचा पदाधिकारी नंदू जोशी यांच्याकडून आपल्या जीवाला धोका आहे, अशी तक्रार पीडित महिलेने मानपाडा पोलीस ठाण्यात गुरुवारी केली. तसेच, जोशी यांच्या विरुध्द गुन्हा दाखल होऊन आठवडा होत आला आहे. त्यामुळे त्यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी पीडितेने गुरुवारी माध्यमांशी बोलताना केली.

हेही वाचा >>> Mira Road Crime : सरस्वती आणि मनोज एकमेकांच्या आयुष्यात कसे आले? हत्याकांडापर्यंत काय घडलं?

Abhishek Ghosalkar, murder,
अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण : एकापेक्षा जास्त व्यक्तींच्या सहभागाच्या दृष्टीने तपास केला का ? उच्च न्यायालयाची पोलिसांना विचारणा
pankaja munde manoj jarange (1)
“ही गोपीनाथ मुंडेंची औलाद कधी…”, मनोज जरांगेंवरील कथित टीकेवर पंकजा मुंडेंचा खुलासा
loksatta explained article, bahujan vikas aghadi, hitendra thakur, politics, Vasai, Palghar
विश्लेषण : पालघर-वसईत हितेंद्र ठाकुरांशी सर्वच पक्षांना जुळवून का घ्यावे लागते? ठाकुरांच्या यशाचे रहस्य काय?
raj thackray mns latest news
मनसेच्या विश्वासार्हतेला उतरती कळा; बदलत्या भूमिकेमुळे पदाधिकारी-कार्यकर्त्यांत संभ्रम

पीडित महिला ही डोंबिवली भाजप ग्रामीण संघटनेत कार्यरत आहे. भाजपचे डोंबिवली पूर्व मंडळ अध्यक्ष नंदू जोशी आपणास सतत त्रास देत आहेत. आपल्याकडे शरीर सुखाची मागणी करत आहेत, अशा तक्रारी आपण भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह पोलीस ठाण्यात केल्या, त्याची दखल कधी कोणी घेतली नाही. मानपाडा पोलिसांनी मात्र आता त्याची दखल घेतली. जोशी भाजपच्या एका नेत्याचे खास समर्थक असल्याने त्यांच्या विरुध्द कधी कोणी कारवाई केली नाही, असे पीडित महिलेने माध्यमांना सांगितले.

गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रथमच पीडित महिला गुरुवारी माध्यमांसमोर हजर झाली. पीडिता एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची पत्नी आहे. या महिलेचा पती आणि पीडिता यांच्यात पाच वर्षापासून कौटुंबिक वाद सुरू आहेत. या पोलीस अधिकाऱ्याचे जोशी हे मित्र आहेत. या वादाच्या माध्यमातून काही निमित्त काढून जोशी आपल्या घरी येऊन आपल्याकडे शरीर सुखाची मागणी करत आहेत. मानपाड्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांची बदली होताच आपण तुला जीवे ठार मारू अशी धमकी जोशी देत असल्याची तक्रार पीडितेने केली.

हेही वाचा >>> Mira Road Murder : सरस्वतीची हत्या करणारा मनोज साने दुर्धर आजाराने त्रस्त

‘गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या महिलेशी आपण काही बोललो नाही की त्या महिलेला कोठे भेटलेलो नाही. त्यामुळे आपली बदनामी करण्यासाठी तिने हे आरोप केले आहेत. उलट आपण गुन्हा केला असल्याने पोलिसांनी आपणास अटक करावी. मी डोंबिवलीत घरी आहे. मी कोठेही पळून गेलो नाही,’ असे भाजप पदाधिकारी नंदू जोशी यांनी सांगितले. कल्याण मधील कार्यक्रमात शिवसेनेच्या कार्यक्रमावर भाजपने बहिष्कार टाकण्याची भाषा केल्यावरच जोशी यांच्या विरुध्द गुरुवारी पुन्हा पोलीस ठाण्यात तक्रार झाल्याने यामध्ये काही मंडळींचा हात असण्याची शक्यता भाजप पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. जोशी आणि भाजपला बदनाम करण्याचे हे षडयंत्र असल्याचा आरोप भाजप पदाधिकाऱ्यांनी केला.