scorecardresearch

क्रेडिट कार्डवरील खर्च मर्यादा वाढवून देतो सांगून डोंबिवलीत महिलेची फसवणूक

विष्णुनगर पोलीस ठाण्यात या महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

क्रेडिट कार्डवरील खर्च मर्यादा वाढवून देतो सांगून डोंबिवलीत महिलेची फसवणूक
प्रतिनिधिक छायाचित्र

डोंबिवली– आपल्या क्रेडिट कार्ड वरील दोन लाख रुपयांची खर्च मर्यादा वाढून तुम्हाला नवीन क्रेंडिट कार्ड देतो असे सांगून डोंबिवलीतील एका नोकरदार महिलेची एका भामट्याने फसवणूक केली आहे. विष्णुनगर पोलीस ठाण्यात या महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा >>> कल्याण पूर्वेतील विजयनगर येथील कमानीमुळे वाहन चालक त्रस्त ; एक महिन्यापासून कमान रस्त्यावर

गेल्या पाच महिन्यांपासून हा फसवणुकीचा प्रकार सुरू होता. अंकित तिवारी या इसमाने दोन लाख ११ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली आहे. शिला वर्गीस (५७, रा. चंद्रेश कुंज लोढा हेवन, निळजे, डोंबिवली) असे तक्रारदार महिलेचे नाव आहे. आरोपी अंकित हा गेल्या मे महिन्यापासून शिला यांना मोबाईलच्या माध्यमातून संपर्क करुन तुमचे क्रेडिट कार्ड खर्च मर्यादा वाढवून देतो असे सांगून त्यांच्याशी संपर्क साधत होता. आपणास खर्च मर्यादा वाढून मिळतेय, नवीन क्रेंडिट कार्ड मिळणार म्हणून शिला यांनी आपली आवश्यक माहिती अंकितला दिली.  या संधीचा गैरफायदा घेत अंकितने शिला यांच्या क्रेडिट कार्ड मधून दोन लाख रुपये परस्पर आपल्या बँक खात्यात वर्ग करुन शिला यांच फसवणूक केली.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या