scorecardresearch

ठाणे : स्टोव्हमधील आगीच्या भडक्याने महिला जखमी

रेश्मा जाधव (४१) असे जखमी महिलेचे नाव असून, त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.

Woman injured stove fire Thane
स्टोव्हमधील आगीच्या भडक्याने महिला जखमी (छायाचित्र – लोकसत्ता टीम/ग्राफिक्स)

ठाणे : दादोजी कोंडदेव क्रिडा प्रेक्षागृह परिसरात स्टोव्हमधील आगीच्या भडक्याने एक महिलेच्या हाताला आणि चेहऱ्याला भाजल्याने ती जखमी झाल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. रेश्मा जाधव (४१) असे जखमी महिलेचे नाव असून, त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा – उल्हासनगरच्या प्रशासकांकडून अवास्तवी अर्थसंकल्प; करवसुलीत अपयश असूनही अर्थसंकल्प ८४३ कोटींवर

हेही वाचा – कल्याण रेल्वे स्थानकात प्रवाशांना मारहाण करून लुटले

दादोजी कोंडदेव क्रिडा प्रेक्षागृह येथील शंकर मंदिराजवळ महापालिकेच्या चाळी आहेत. या चाळीमध्ये रेश्मा जाधव यांचे एकमजली घर आहे. गुरुवारी सकाळी रेश्मा या पूजेसाठी स्टोव्हवर धूप जाळत असताना अचानक आगीचा भडका उडाला. या घटनेत रेश्मा यांच्या चेहऱ्याला आणि हाताला भाजले गेले. त्यांच्यावर परिसरातील एका खासगी दवाखान्यात उपचार सुरू होते.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-03-2023 at 19:16 IST

संबंधित बातम्या