लोकसत्ता खास प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डोंबिवली : ठाण्यातील कासारवडवली भागातील एका खासगी कंपनीत एका ४२ वर्षाच्या महिला अधिकाऱ्याचा याच कंपनीतील एका ३२ वर्षाच्या कर्मचाऱ्याने विनयभंग केला आहे. ही महिला डोंबिवलीतील पलावा गृहसंकुलात राहत असल्याने कासारवडवली पोलिसांनी हा गुन्हा मानपाडा पोलीस ठाण्यात अधिक चौकशीसाठी वर्ग केला आहे.

ठाण्यातील कासारवडवली येथील कॉन्सनट्रिक्स जी कॉर्प या कंपनीच्या भोजनगृहात गेल्या महिन्यात हा प्रकार घडला होता. याप्रकरणी तक्रारदार महिला अधिकाऱ्याने काम करत असलेल्या कंपनीच्या वरिष्ठांना यासंदर्भात लेखी तक्रार केली होती. या तक्रार अर्जाची चौकशी केल्यानंतर कंपनी प्रशासनाने या पीडित महिला अधिकाऱ्याला पोलीस ठाण्यात तक्रार करण्याची सूचना केली. प्रितेश जगताप (३४) असे कर्मचाऱ्याचे नाव आहे.

आणखी वाचा- डोंबिवली : तळोजा-खोणी रस्त्यावर प्रवाश्याला पोलीस सांगून दिवसाढवळ्या लुटले

या सूचनेप्रमाणे महिलेने कासारवडवली पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी ही महिला शिळफाटा रस्त्यावरील पलावा वसाहतीत राहत असल्याने तो गुन्हा मानपाडा पोलीस ठाण्यात वर्ग केला आहे.

पोलिसांनी सांगितले, गेल्या महिन्यात दुपारच्या वेळेत पीडित महिला कंपनीच्या भोजनगृहात भोजन करत होत्या. भोजन झाल्यानंतर त्या भोजनगृहात एकट्याच मोबाईलवरील संदेश वाचत बसल्या होत्या. यावेळी भोजनगृहात एक कर्मचारी वगळता कोणीही नव्हते. या संधीचा गैरफायदा घेत कर्मचाऱ्याने महिला अधिकाऱ्याच्या जवळ जाऊन लगट करण्याचा प्रयत्न केला. महिलेने त्या दूर ढकलले आणि त्यास असे करण्यापासून प्रतिबंधक केला. तरीही या कर्मचाऱ्याने महिलेचा प्रतिकार झिडकारून त्या महिलेला मिठी मारली. या महिलेने त्या मिठीतून सोडून त्याला मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याने पळ काढला. महिलेने त्याला पाठलाग करून पकडण्याचा प्रयत्न केला पण तो पळून गेला.साहाय्यक पोलीस निरीक्षक गोविंद आरळेकर या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman officer was molested by an employee in a company in thane mrj
Show comments