कल्याण – येथील पश्चिम रेल्वे स्थानक भागात स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत उड्डाण पूल उभारणीचे काम सुरू आहे. या पुलाच्या कामासाठी एक कामगार दोन महिन्यांपूर्वी रात्री दीड वाजताच्यादरम्यान कल्याण गेस्ट हाऊससमोरील भागात जाळी टाकण्याचे काम करत होता. यावेळी कामगाराच्या हातामधील मोजणी पट्टी बांधकामाच्या जाळीवर पडली. ही मोजणी पट्टी काढण्यासाठी संरक्षित जाळीवरून चालत असताना तोल जाऊन कामगार २० फूट खाली रस्त्यावर पडला. तो जागीच मरण पावला.

पिंटू राधेशाम कुशवाह (३१) असे मृत कामगाराचे नाव आहे. या कामगाराच्या मृत्यूला जबाबदार धरून या कामाचा ठेकेदार प्रेमशंकर सुंदर प्रसाद मिस्त्री यांच्यावर निष्काळजीपणाचा ठपका ठेऊन महात्मा फुले पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर वाघमारे यांनी दोन महिन्यांनंतर गुन्हा दाखल केला आहे.

buldhana, Tractor Crushes Kotwal , Trying to Stop Illegal Sand Transportation, sangrampur taluka, illegal sand Transportation, marathi news,
बुलढाणा : रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने कोतवालास चिरडले
Pimpri, police died, police hit by vehicle,
पिंपरी : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मृत्यू
A youth from Nalasopara committed suicide by consuming poison due to cyber fraud
सायबर भामट्यांनी घातला २ लाखांचा गंडा; वडील रागावतील म्हणून मुलाची आत्महत्या
Two Drunk Policemen, Vandalize Hotel, Assault Owner, hudkeshwar police station, crime, marathi news,
मद्यधुंद पोलिसांची भोजनालयात तोडफोड, चित्रफीत प्रसारित झाल्याने खळबळ

हेही वाचा – ठाणे जिल्हा रुग्णालयाचा नैसर्गिक प्रसुतीवर भर; २६ हजारपैकी तीन हजार महिलांची शस्त्रक्रियेद्वारे प्रसुती

हेही वाचा – कल्याण-डोंबिवलीतील २८४ रस्ते बाधितांना घरांचे वाटप

पिंटू हे रात्री दीड वाजताच्यादरम्यान कल्याण डोंबिवली पालिकेतर्फे कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक भागात स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या प्रकल्पात काम करत होते. हे काम करत असताना त्यांच्या हातामधील मोजणी पट्टी सुरक्षिततेसाठी बांधलेल्या हिरव्या जाळीवर पडली. ही पट्टी काढण्यासाठी पिंटू खांबाचा आधार घेऊन खाली उतरले. जाळीवरून चालत जाऊन पट्टी घेण्याचा प्रयत्न करू लागले. यावेळी त्यांचा तोल गेला आणि जाळीपेक्षा त्यांचे वजन अधिक असल्याने जाळी फाटून पिंटू २० फुटावरून रस्त्यावर कोसळले. त्यांच्या नाका तोंडातून रक्तस्त्राव सुरू झाला. त्यांना तातडीने रुक्मिणीबाई रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांना डाॅक्टरांनी मृत घोषित केले.