बदलापूरः ग्रामीण भागात वन्यजीवांची होणारी तस्करी रोखण्यासाठी सामाजिक संस्था, वन विभाग, पोलीस यांच्यामध्ये त्याबाबत जनजागृतीची गरज आहे. तसेच ही प्रकरणे तडीस नेण्यासाठी न्यायालयातील कर्मचारी, वकिलांनाही त्याबाबतची सखोल माहिती असण्याची गरज आहे. या सर्वांची सांगड घालण्याच्या हेतूने मुरबाडमध्ये वन्यजीव सप्ताहाअंतर्गत विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सामाजिक संस्था, पोलीस, वन विभाग आणि न्यायालयीने कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला.

हेही वाचा >>> ठाणे : जीन्स धुलाई कारखान्यांमुळे उल्हास नदीत प्रदूषणाची भीती

shiv sena spent rs 70 thousand on sakhi mahotsav
शिवसेनेच्या सखी महोत्सवासाठी केवळ ७० हजार खर्च ? माहिती अधिकार कार्यकर्त्याची तक्रार
3334 children underwent heart surgery under the National Child Health Programme
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत ३,३३४ मुलांवर हृदय शस्त्रक्रिया! दोन कोटी बालकांची आरोग्य तपासणी…
Traffic changes in Divisional Commissioner office area due to show of force by candidates Pune news
उमेदवारांच्या शक्ती प्रदर्शनामुळे विभागीय आयुक्त कार्यालय परिसरात वाहतूक बदल… काय आहेत बदल?
piyush goyal
कर्तबगारीने ‘तेजांकित’ झालेल्यांचा गौरव!

सध्या २ ते ८ ऑक्टोबर वन्यजीव सप्ताह साजरा केला जातो आहे. या सप्ताहाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते आहे. या मालिकेत मुरबाडमध्ये गुरूवारी एक अनोखी कार्यशाळा संपन्न झाली. वन्यजीव गुन्हे नियंत्रण कक्ष, वन विभाग, इनटॅच ठाणे आणि अश्वमेध प्रतिष्ठानच्या माध्यमातून वन्यजीव तस्करी रोखण्यासाठी आवश्यक प्रबोधनासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. शहरी भागात वन्य जीवांची तस्करीबाबत माहिती, ज्ञान असल्याने ती रोखण्यात, पकडण्यात यश येते. ग्रामीण भागात मात्र याबाबतचे ज्ञान कमी असल्ये वन्यजीवांची तस्करी सहजासहजी कळून येत नाही. या तस्करीत सर्वात महत्वाची भूमिका सामाजिक संस्था, संघटना यांची असते. त्यांना या प्रक्रियेत सामावून घेतल्यात माहिती तात्काळ मिळू शकते. मात्र ही माहिती मिळाल्यावर वन विभागाचे कर्मचारी, पोलीस कर्मचारी यांनी कशाप्रकारे हे प्रकरण हाताळावे, त्याप्रकरणी गुन्हे कोणत्या कलमाखाली दाखल करावे. त्यासाठी कोणत्या गोष्टींचा विचार करावा हे कळणे आवश्यक असते. अन्यथा तस्करी करणारे सहजरिस्ता सुटू शकतात. तसेच या प्रकरणांना तडीस लावण्यासाठी न्यायालयीन कर्मचारी, वकिलांनीही काय तयारी करावी याबाबत माहिती देण्यासाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन मुरबाडमध्ये करण्यात आले होते. वन्यजीव तस्करी हा विषय कोणत्याही एका विभागाचा नसून यामध्ये शासकीय संस्था आणि सामाजिक संस्थांमध्ये सुसंवाद असेल तर सहजपणे ही प्रकरणे उघडकीस आणून तडीस लावता येतील, या हेतूने ही कार्यशाळा आयोजीत करण्यात आल्याची माहिती मानद वन्यजीव संरक्षक अविनाश हरड यांनी दिली आहे. या कार्यशाळेत वन्यजीव गुन्हे नियंत्रण कक्षाचे प्रतिनिधी यांनी सादरीकरण केले. यात काही सामाजिक संस्थाही सहभाही झाल्या होत्या. ठाणे शहरापलिकडे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात झालेली ही पहिली कार्यशाळा ठरली आहे. याप्रसंगी जिल्ह्याचे उपवन संरक्षक संतोष सस्ते, सेवानिवृत्त वन अधिकारी अजय पिलारीसेठ, विविध वनक्षेत्रपाल, मुरबाड नगर पंचायतीचे परिषोत कंकाळ, मुरबाडचे पोलिस निरिक्षक प्रसाद पांढरे, सामाजिक संस्थाचे पदाधिकारी आणि वन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.