workshop in murbad to counter wildlife trafficking zws 70 | Loksatta

वन्यजीव तस्करी रोखण्यासाठी कार्यशाळा ; पोलीस, वन विभाग, न्यायालय आणि सामाजिक सस्थांचा सहभाग

सध्या २ ते ८ ऑक्टोबर वन्यजीव सप्ताह साजरा केला जातो आहे. या सप्ताहाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते आहे.

वन्यजीव तस्करी रोखण्यासाठी कार्यशाळा ; पोलीस, वन विभाग, न्यायालय आणि सामाजिक सस्थांचा सहभाग

बदलापूरः ग्रामीण भागात वन्यजीवांची होणारी तस्करी रोखण्यासाठी सामाजिक संस्था, वन विभाग, पोलीस यांच्यामध्ये त्याबाबत जनजागृतीची गरज आहे. तसेच ही प्रकरणे तडीस नेण्यासाठी न्यायालयातील कर्मचारी, वकिलांनाही त्याबाबतची सखोल माहिती असण्याची गरज आहे. या सर्वांची सांगड घालण्याच्या हेतूने मुरबाडमध्ये वन्यजीव सप्ताहाअंतर्गत विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सामाजिक संस्था, पोलीस, वन विभाग आणि न्यायालयीने कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला.

हेही वाचा >>> ठाणे : जीन्स धुलाई कारखान्यांमुळे उल्हास नदीत प्रदूषणाची भीती

सध्या २ ते ८ ऑक्टोबर वन्यजीव सप्ताह साजरा केला जातो आहे. या सप्ताहाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते आहे. या मालिकेत मुरबाडमध्ये गुरूवारी एक अनोखी कार्यशाळा संपन्न झाली. वन्यजीव गुन्हे नियंत्रण कक्ष, वन विभाग, इनटॅच ठाणे आणि अश्वमेध प्रतिष्ठानच्या माध्यमातून वन्यजीव तस्करी रोखण्यासाठी आवश्यक प्रबोधनासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. शहरी भागात वन्य जीवांची तस्करीबाबत माहिती, ज्ञान असल्याने ती रोखण्यात, पकडण्यात यश येते. ग्रामीण भागात मात्र याबाबतचे ज्ञान कमी असल्ये वन्यजीवांची तस्करी सहजासहजी कळून येत नाही. या तस्करीत सर्वात महत्वाची भूमिका सामाजिक संस्था, संघटना यांची असते. त्यांना या प्रक्रियेत सामावून घेतल्यात माहिती तात्काळ मिळू शकते. मात्र ही माहिती मिळाल्यावर वन विभागाचे कर्मचारी, पोलीस कर्मचारी यांनी कशाप्रकारे हे प्रकरण हाताळावे, त्याप्रकरणी गुन्हे कोणत्या कलमाखाली दाखल करावे. त्यासाठी कोणत्या गोष्टींचा विचार करावा हे कळणे आवश्यक असते. अन्यथा तस्करी करणारे सहजरिस्ता सुटू शकतात. तसेच या प्रकरणांना तडीस लावण्यासाठी न्यायालयीन कर्मचारी, वकिलांनीही काय तयारी करावी याबाबत माहिती देण्यासाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन मुरबाडमध्ये करण्यात आले होते. वन्यजीव तस्करी हा विषय कोणत्याही एका विभागाचा नसून यामध्ये शासकीय संस्था आणि सामाजिक संस्थांमध्ये सुसंवाद असेल तर सहजपणे ही प्रकरणे उघडकीस आणून तडीस लावता येतील, या हेतूने ही कार्यशाळा आयोजीत करण्यात आल्याची माहिती मानद वन्यजीव संरक्षक अविनाश हरड यांनी दिली आहे. या कार्यशाळेत वन्यजीव गुन्हे नियंत्रण कक्षाचे प्रतिनिधी यांनी सादरीकरण केले. यात काही सामाजिक संस्थाही सहभाही झाल्या होत्या. ठाणे शहरापलिकडे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात झालेली ही पहिली कार्यशाळा ठरली आहे. याप्रसंगी जिल्ह्याचे उपवन संरक्षक संतोष सस्ते, सेवानिवृत्त वन अधिकारी अजय पिलारीसेठ, विविध वनक्षेत्रपाल, मुरबाड नगर पंचायतीचे परिषोत कंकाळ, मुरबाडचे पोलिस निरिक्षक प्रसाद पांढरे, सामाजिक संस्थाचे पदाधिकारी आणि वन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
उद्धव ठाकरेंनी दीड वर्षाच्या मुलाचा उल्लेख केल्याने श्रीकांत शिंदे दुखावले, हात जोडून केली विनंती, म्हणाले “बाळावर माया करणाऱ्या आईचा शाप…”

संबंधित बातम्या

ठाणे मनोरुग्णालयात सुरु होणार मानसोपचार परिचर्या पदविका अभ्यासक्रम
ठाणे, नवी मुंबईत शिवसेनेला धक्का ; बहुतांश माजी नगरसेवक शिंदे गटात  
डोंबिवलीत शिवसेना मध्यवर्ती शाखेचा ताबा घेण्यावरुन ठाकरे-शिंदे गटात राडा; ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण
ठाणे : अल्पवयीन मुलीवर सामूहिक लैंगिक अत्याचार ; समाजमाध्यमावर झाली होती ओळख
डोंबिवली, ठाणे येथे नाना धर्माधिकारी प्रतिष्ठान, कडोंमपातर्फे १७५ टन निर्माल्याचे संकलन

व्हिडिओ

ताज्या बातम्या
आंतरराष्ट्रीय पातळीवरील मुंबईची ओळख बळकट करणार – एकनाथ शिंदे
शिंदे गटातील कार्यकर्त्यांच्या तक्रारीवरून बनावट प्रतिज्ञापत्रप्रकरणी अंधेरीत गुन्हा दाखल
पंतप्रधानांच्या घोषणेतील वचन पाळणे बंधनकारक नाही; नोटाबंदीतील सुनावणीत रिझव्‍‌र्ह बँकेच्या वकिलांचा दावा
ठाणे, नवी मुंबई, विरारमध्ये म्हाडाची दोन हजार घरे; येत्या १० दिवसांत जाहिरात, सोडत लवकरच