scorecardresearch

Premium

कल्याणमध्ये विसर्जनस्थळी तरुणीला बेदम मारहाण

कल्याण पूर्व भागातील मलंगगड रस्त्यावरील नांदिवली तर्फ गावातील तलावावर आपल्या नातेवाईकांसह गणपती विसर्जनासाठी आलेल्या एका २० वर्षांच्या तरुणीला तरुणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केली.

Young girl beaten Kalyan
कल्याणमध्ये विसर्जनस्थळी तरुणीला बेदम मारहाण (image – pixabay/representational image)

कल्याण – कल्याण पूर्व भागातील मलंगगड रस्त्यावरील नांदिवली तर्फ गावातील तलावावर आपल्या नातेवाईकांसह गणपती विसर्जनासाठी आलेल्या एका २० वर्षांच्या तरुणीला तरुणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केली. यावेळी तिच्या नातेवाईकालाही मारहाण झाली. सोमवारी रात्री साडेअकरा वाजता हा प्रकार घडला.

अंजली हरीश ठाकूर असे मारहाण झालेल्या तरुणीचे नाव आहे. ती मलंगगड रस्ता भागातील आडिवली भागात राहते. सोमवारी अंजली आपल्या नातेवाईकांसह नांदिवली तर्फ गावातील तलावावर गणपती विसर्जनासाठी गेली होती. त्यावेळी रात्रीचे साडेअकरा वाजले होते. विसर्जन करुन घरी पायी येत असताना जुन्या भांडणाचा राग मनात धरुन आरोपी सैफ अली खान, राम तिवारी, स्काय गुलाम, सत्यम, भावेश आणि विशाल (पूर्ण नाव नाही) आणि त्यांच्या साथीदारांनी अंजलीला रस्त्यात अडवले. तिला शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. अंजलीचे नातेवाईक तिच्या बचावासाठी पुढे आले तर टोळक्याने त्यांनाही मारहाण केली. टोळक्यातील एका तरुणाने जवळील चाकूने अंजलीला दुखापत केली.

fire in kothrud
कोथरूडमधील आगीमध्ये आलिशान सदनिकेतील पाच खोल्या भक्ष्यस्थानी
Cell phone theft in immersion procession
विसर्जन मिरवणुकीत मोबाइल चोरट्यांचा उच्छाद…पोलिसांच्या ‘लॉस्ट अँड फाऊंड’ पोर्टलवर ‘एवढ्या’ नागरिकांनी केल्या तक्रारी
roads waterlogged traffic disrupted due to heavy rain in pimpri chinchwad
पिंपरी-चिंचवडमध्ये संततधार;पाणी साचल्याने रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी
pune heavy rain, rainwater accumulated on the roads in pune, pune street lights off due to rain
पावसाळापूर्व कामे केल्याचा महापालिकेचा दावा फोल; पुण्यातील रस्ते जलमय

हेही वाचा – कसारा-सीएसएमटी रेल्वे वाहतूक ठप्प, खर्डी रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीच्या इंजिनात बिघाड

हेही वाचा – ठाणे : भविष्यातील रेल्वे प्रकल्प रखडलेले

मारहाणीनंतर सात ते आठ तरुण घटनास्थळावरून पळून गेले. अंजलीने याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलीस उपनिरीक्षक पी. एस. ढेंबरे तपास करत आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Young girl brutally beaten at immersion site in kalyan ssb

First published on: 26-09-2023 at 13:43 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×