scorecardresearch

धावत्या एक्स्प्रेसमधून पडून तरुणीचा मृत्यू

उलटी आल्याने ती एक्स्प्रेसच्या दारात येऊन बसून उलटी करू लागली. तिला चक्कर आली. तोल जाऊन ती रेल्वे मार्गात पडली.

(प्रतिनिधिक छायाचित्र)

डोंबिवली : धावत्या पवन एक्स्प्रेसमधून पडून एका तरुणीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी डोंबिवलीजवळील कोपर रेल्वे स्थानकाजवळ घडली. या तरुणीला डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी उपचारासाठी तात्काळ पालिका रुग्णालयात दाखल केले. तत्पूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. शीतलकुमार साहनी (१६) असे मृत तरुणीचे नाव आहे. बिहार येथील मुझफ्फरनगर येथील ही तरुणी मुंबईतून आई, वडिलांसोबत पवन एक्स्प्रेसने प्रवास करत होती. दिवा-कोपर रेल्वे स्थानकांच्या दरम्यान तिला अस्वस्थ वाटू लागले. उलटी आल्याने ती एक्स्प्रेसच्या दारात येऊन बसून उलटी करू लागली. तिला चक्कर आली. तोल जाऊन ती रेल्वे मार्गात पडली. तिच्या आईवडिलांच्या हा प्रकार लक्षात येताच, त्यांनी तात्काळ साखळी खेचली. डोंबिवली रेल्वे स्थानकात एक्स्प्रेस थांबली. हा प्रकार तिच्या पालकांनी लोहमार्ग पोलिसांना सांगितल्यावर, ते तात्काळ घटनास्थळी गेले.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Young woman dies after falling from running express zws