youth was cheated of lakhs of rupees by pretending to be a bank employee in thane ssb 93 | Loksatta

ठाणे : बँकेचा कर्मचारी बोलत असल्याचे सांगून तरुणाची लाखो रुपयांची फसवणूक

याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

ठाणे : बँकेचा कर्मचारी बोलत असल्याचे सांगून तरुणाची लाखो रुपयांची फसवणूक
बँकेचा कर्मचारी असल्याचे सांगून तरुणाची लाखो रुपयांची फसवणूक

वागळे इस्टेट येथील रोड नं. २२ भागात एका ३६ वर्षीय व्यक्तिची बँकेचे कर्मचारी असल्याचे भासवून ८ लाख ५९ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

हेही वाचा – नाशिकमधील ३२ वर्षांच्या महिलेकडून कल्याणच्या अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण

हेही वाचा – ठाण्यात राष्ट्रवादीला खिंडार? १५-१६ माजी नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करण्याच्या तयारीत

रोड नं. २२ येथे फसवणूक झालेला तरूण राहतो. त्याचा क्रेन भाड्याने देण्याचा व्यवसाय आहे. काही दिवसांपूर्वी त्याला मोबाईल क्रमांकावर एका व्यक्तीने संपर्क साधला. आपण बँकेचे कर्मचारी बोलत असून मोबाईल क्रमांकावर पाठविलेल्या लिंकवर वैयक्तिक माहिती भरण्यास त्या व्यक्तीने तरूणाला सांगितले. त्यानुसार तरूणाने माहिती भरली असता त्यांच्या खात्यातील ८ लाख ५९ हजार रुपये अचानक गायब झाले. याप्रकरणी तरुणाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2023 at 15:46 IST
Next Story
ठाण्यात राष्ट्रवादीला खिंडार? १५-१६ माजी नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करण्याच्या तयारीत