News Flash

फूड पोर्नचे फॅड

आपण खरे तर जगतो कशावर आणि कशासाठी, याचे अलौकिकार्थी तोंडदाखल प्रत्येकाचे उत्तर असले, तरी मानवाच्या ‘वस्त्र’, ‘निवारा’, ‘काम’ आदी मूलभूतादित्यांना थिटे करण्याची ताकद एकटय़ा अन्नसम्राटामध्ये

| November 29, 2014 04:14 am

फूड पोर्नचे फॅड

आपण खरे तर जगतो कशावर आणि कशासाठी, याचे अलौकिकार्थी तोंडदाखल प्रत्येकाचे उत्तर असले, तरी मानवाच्या ‘वस्त्र’, ‘निवारा’, ‘काम’ आदी मूलभूतादित्यांना थिटे करण्याची ताकद एकटय़ा अन्नसम्राटामध्ये असते. पैशाने राजा आणि रंकेश्वर असलेल्या दोहोंनाही पर्याप्त उष्मांक असलेला आहारच हवा असतो. ग्लोबलोत्तर भारतात खादाडीची ग्लोकल पक्वान्ने उपलब्ध झाली. टीव्ही आणि समाजमाध्यमे खादाडी गुरू बनत लोकांना फूडपोर्निक बनवीत चालली आहेत. खादाडीच्या छायाचित्रांनी आपल्या सोशल माध्यमावरील स्टेट्सला अपडेट्स करण्याचे फॅड दिवसेंदिवस वाढत चालले आहे. यात वावगे काहीच नाही, पण या फूड पोर्न व्यसनामध्ये अनेक कंगोरे दडलेले आहेत. खादाडी प्रदर्शनाचा अट्टहास बाळगणाऱ्या आपल्या सर्वाना त्याची ओळख करून देण्याचा हा प्रयत्न..

स्मार्ट फोन आल्यापासून एक नवा विषय आजकाल जास्तीत जास्त चर्चिला जाऊ लागला आहे, तो म्हणजे फूड पोर्न. याचा संबंध अश्लीलतेशी सुतराम नाही, तर लाडक्या खाद्यपदार्थाच्या th03छायाचित्रणाशी आहे. पूर्वीचा काळ आठवा! घरात येणाऱ्या सुनेला ताट वाढण्याचं तंत्र अवगत असलंच पाहिजे, असा दंडक होता. आता उथळ पैशाला खळखळाट फार असल्याने बहुतेक वेळा जेवणावळी हॉटेलातच होतात व नंतर त्याचे शब्दचित्र सांगण्यातच वेळ जातो. आजची हॉटेल्सही फार वेगळी आहेत. त्यांच्या वास्तुरचनेपासून वातावरणापर्यंत सगळे महत्त्वाचे ठरते. पूर्वी या अन्नाचे शब्दचित्र रंगवण्यासाठी काही खवय्ये पत्रकार आपली लेखणी झिजवत असत व त्याची कात्रणे त्या हॉटेल्समध्ये लागत असत. एक प्रकारे ते प्रशस्तिपत्र असे.
कुठल्याही हॉटेलमध्ये गेल्यानंतर, तिथले सगळे पाहिल्यानंतर, सजवलेली डिश समोर आल्यानंतर महागडय़ा अशा पाच मेगा पिक्सेलपेक्षा जास्तच क्षमतेच्या कॅमेऱ्याने फोटो काढून तरुण मंडळी त्या अन्नसजावटीची छायाचित्रे इन्स्टाग्राम, पिन्टरेस्टवर टाकू लागले आहेत. अनेक शेफ म्हणजे खानसाम्यांचे ब्लॉग्ज आहेत तसे खवय्यांचेही ब्लॉग्ज आहेत. खरे तर अन्न कसे दिसते यापेक्षा चवीला महत्त्व आहे, असे कुणीही म्हणेल; पण ते खावेसे वाटेल असे ते सजवलेले असेल, त्यावर th04गार्निशिंग असेल, तर तुमच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही, भले त्याची चव काहीही असो. थोडक्यात हे जाहिरातीचेही तंत्र असते. फूड पोर्नचा वापर जाहिरातीसाठीही केला जातो. काही अन्न छायाचित्रकारही केवळ हाच विषय घेऊन काम करतात. संजीव कपूरचा कुकरी शो कसा गाजला, नंतर त्याची पुस्तकेही आली, हा त्याच्या आधीचा जमाना होता. त्याआधी तरला दलाल यांनी असा फूड शो यशस्वी केला व अन्नाचे महत्त्व लोकांपर्यंत नेले; पण आता हौशी शेफही खाद्यपदार्थ तयार करून त्यांची छायाचित्रे, वर्णने त्यांच्या ब्लॉग्जवर टाकतात. आताशा नेहमीची मासिके याबाबतीत मागे पडली आहेत, कारण ती वाचावी लागतात. इथे तुम्ही फक्त डोळे उघडे ठेवणे एवढेच काम असते. थोडक्यात या फूड पोर्नचा उद्देश तुमचे अन्नपदार्थ किती चांगले आहेत व ते खाण्यासाठी भाग पाडणे व त्यासाठी पैसे मोजायला लावणे हाच खरा तर उद्देश असतो.

जाहिरात आणि वास्तव
टीव्हीवरील जाहिरात, इझी टू मेड खाद्यपदार्थाच्या पाकिटावरील छायाचित्र आणि महागडय़ा हॉटेलमध्ये टेबलावर दाखल होणारी डिश यांमधील खाद्यपदार्थाच्या रंगसंगती जवळपासही जाणारे अन्न घरी बनू शकत नाही, याचे कारण खानसाम्यांचे त्यामधील प्रावीण्य आहेच, त्याचबरोबर त्यांची जाहिरात करताना केले जाणारे छायाचित्रही आहे. वीर संघवी यांच्यासारखे हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच खाद्यसमीक्षक आज उरलेले आहेत. त्यांच्या स्तंभामध्ये देशातील सर्वच देशी-विदेशी खाद्यसाखळ्यांच्या क्लृप्त्यांची आणि खाद्यविज्ञानाची चर्चा होत असते.

फूड फोटोग्राफर ऑफ द इयर
द फूड अ‍ॅवॉर्ड्स कंपनी व पिंक लेडी अ‍ॅपल्स यांनी अन्नाच्या छायाचित्रणासाठी पुरस्कार ठेवला आहे. त्यांच्या परीक्षकांत अन्न समीक्षक जे रेनर, खानसामा
जेम्स मार्ठिन, टॉम एकेन्स कारलुसियो, बिल ग्रॅगर अशा अनेक दिग्गजांचा समावेश आहे. २०१३ मध्ये ५५०० स्पर्धक होते. त्यांच्या संकेतस्थळास १४० देशांतून प्रतिसाद मिळाला. हे पारितोषिक पाच हजार पौंडांचे असून २०१३ मध्ये ते रोमानियाचे छायाचित्रकार अ‍ॅलेक्झांड्रिना पाडय़ुरेटू यांना मिळाले.

फूड पोर्न व जाहिराती
फूड पोर्नचा वापर अन्नाच्या जाहिरातींसाठी केला जातो. अमेरिकेत २०१२ मध्ये अन्नपदार्थाच्या जाहिरातींवर ४.६ अब्ज डॉलर्स खर्च झाले. मॅकडोनाल्ड, सबवे यांसारख्या कंपन्या अब्जावधी डॉलर्स त्यावर खर्च करतात. १९९६ ते २००६ दरम्यान मॅकडोनाल्डच्या जाहिरातीत डिस्ने कंपनी भागीदार होती. नंतर त्यांनी वेगळ्या अ‍ॅनिमेशन स्टुडिओशी भागीदारी केली. केएफसी म्हणजे केंटुकी फ्राइड चिकन व मॅकडोनाल्ड, पिझ्झा हट यांनी याच तंत्राने भारतात पाय रोवले आहेत. फास्ट फूड लोकप्रिय करण्यातही फूड पोर्नचा मोठा वाटा आहे.

ब्लॉग्ज व इतर काही
आदर्श मुंजाल हे सोशल मीडिया व्यावसायिक द बिग भुक्कड नावाचा ब्लॉग चालवतात, त्याचे २००० फॉलोअर्स आहेत. झवेरी डायमंड र्मचट यांच्या फूड ब्लॉगला २७०० फॉलोअर्स आहेत. फूड इन्स्टाग्राम हा छंद मानला जातो. एकाने तर त्यात चौदा थरांचे चॉकलेट टाकले होते. काही वेळा हॉटेलमध्ये अशी छायाचित्रे काढू देत नाहीत, कारण इतरांना त्याचा त्रास होऊ शकतो. न्यूयॉर्कमध्ये अशा हौशी छायाचित्रणावर बंदी घालण्यात आली. भारतात मात्र अशी छायाचित्रे काढू दिली जातात, कारण त्यामुळे काही व्यत्यय येतो असे वाटत नाही, असे बांद्रय़ाच्या ऑरस या स्विस रेस्टॉरंटचे शेफ विकी रत्नानी म्हणतात. फूड ब्लॉगर अग्निश्वर बॅनर्जी व तारा कपूर, मोनिका मनचंदा यांनीही ब्लॉगविश्वात बरेच नाव कमावले आहे. मुंबईतील झोरावर कालरा यांचे मसाला लायब्ररी हे हॉटेल इन्स्टाग्रामिंगवर प्रसिद्ध आहे. झवेरी यांच्या ब्लॉगमुळे अनेकांना हिरा पन्नाबाहेरील समोसा व माटुंगा येथील शेवपुरी, टोस्ट सँडविचची सवय लागली आहे. चिकन पेपर फ्राय, बन्र्ट क्रीम विथ ब्लॅक ट्रफल्ससारख्या पदार्थाचेच काय, जिलेबीचे इन्स्टाग्रामिंगसुद्धा तितकेच तोंडाला पाणी आणणारे असते. फूड पोर्न हे प्रतिसादासाठी महत्त्वाचे असते. तुम्हाला त्यातून पैसाही मिळू  शकतो.

संकल्पना
th05फूड पोर्न ही संकल्पना आपल्याकडे नवीन असली तरी परदेशात ती जुनीच आहे. १९८४ मध्ये रोझ्ॉलिंड कॉवर्ड या महिला खादाडी- समीक्षिकेने ‘फिमेल डिझायर’ या पुस्तकात ती प्रथम वापरली. अन्न रांधण्याबरोबरच ते सुंदर पद्धतीने सादर करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. अन्नाचे चित्र मेंदूच्या स्मृतिकोशात चित्राच्या माध्यमातून ठसवणे हा त्याचा हेतू असतो. अमेरिकेत जेव्हा कमी उष्मांकाच्या जंकफूडसारख्या अन्नपदार्थाचा बोलबाला करायचा होता, तेव्हा अन्न उत्पादकांनी फूड पोर्नोग्राफीचा वापर केला. त्या वेळी हा शब्द सेंटर फॉर सायन्स इन पब्लिक इंटरेस्ट या संस्थेने वापरला होता. त्यांचा राइट स्टफ व्हर्सेस फूड पोर्न नावाचा स्तंभच १९९८ पासून सुरू झाला होता. ब्रिटनमध्ये १९८० मध्ये फूड पोर्न लोकप्रिय झाले. त्या वेळी टीव्हीवर कुकरीचे कार्यक्रम दाखवले जात असत. आता फूड पोर्नोग्राफी हा व्यवसायही आहे. अन्नाचे छायाचित्रण करून ते लोकांच्या गळी उतरवण्यासाठी कंपन्यांना असे छायाचित्रकार लागतात. अन्न शैलीकार म्हणजे अन्नाची मांडणी करणारे तज्ज्ञही असतात, त्यांना फूड स्टायलिस्ट असे म्हणतात. अन्नाचे छायाचित्रण करताना किरटी, छोटी छायाचित्रे आता चालत नाहीत. त्यात आता चक्क त्रिमिती दृश्ये दाखवता येतात. त्यामुळे अस्सलतेचा अनुभव येतो; पण काही वेळा हे छायाचित्रण विशिष्ट प्रकाशात, विशेष वातावरणात केले जाते, त्यामुळे ते प्रत्यक्षात वेगळे असू शकते.

ही ऑनलाइन सफर जरूर करा
www.foodily.com, www.yummly.com, simpleindianrecipes.com
simple-baking.blogspot.in, www.drinksmixer.com

Meals
www.youtube.com/user/Manjulaskitchen
www.youtube.com/user/SuperVeggieDelight
www.youtube.com/user/ShowMeTheCurry

Tipples
www.youtube.com/user/BartendingPro
www.youtube.com/user/EverydayDrinkers
www.youtube.com/user/Mocktails4Kids
www.youtube.com/user/TipsyBartender

Desserts
www.youtube.com/user/JoyofBaking1
www.youtube.com/user/HowtoCookThat
www.youtube.com/user/BakingwithRose

अन्नाची सजावट
   th06अन्नाची सजावट करण्यासाठी आपण लिंबाच्या सरबताच्या पेल्याला लिंबाची फोड कापून लावतो, त्यामुळे ते दिसते छान. सँडविचवर गार्निशिंग केले जाते. हिरवा रंग येथे आकर्षित करतो. जणू काही आपण निसर्गाच्या जवळ असल्याची, नैसर्गिक अन्नाचे सेवन करीत आहोत, असा भास तरी होतो. सँडविच वेगवेगळ्या आकारांत कापलेले असतात. शीतपेयांची सजावटही वेगळी असते. ती फसफसत असतात, कारण त्यात सोडा असतो. कोकाकोलाचा फॉम्र्युला सापडल्याचा दावा अनेकांनी आतापर्यंत केला आहे. त्यातही रंग वापरलेले असतात. रंग माणसाला भुलवतात. आइस्क्रीममध्येही रंग, सोडा घालतात आणि आपण ‘यम्मी.. यम्मी’ करत ते चाटत असतो. कॉफी हा अनेकांचा वीक पॉइंट. त्यात वाफाळती कॉफी, कोल्ड कॉफी यांची सजावटही वेगळी असते. स्वाद हा प्रकार मागे पडलेला असतो. जेवणाच्या सजावटीत लिंबू, सॅलड्स यांचा वापर केला जातो; पण ते फ्रिझमध्ये ठेवून मग वापरलेले असतात. अशा ठिकाणी सॅलड कधी खाऊ नये. ताजे सॅलड खाणे चांगले. छान कापलेला टोमॅटो, कांदा, सजवलेला पापड पाहून आपण घरच्या जेवणाला कधी नावे ठेवू लागतो ते कळतही नाही. हे घडण्याचे कारण सजावट हे एक आहे. चव हा मुद्दा तर आहेच. त्यात काहीच चव नसते, असे म्हणण्याचा येथे भाग नाही.

जगातील अकरा प्रसिद्ध फूड ब्लॉग
* द गौडा लाइफ        
* आय बिलिव्ह आय कॅन फ्राय
* फाइव्ह सेकंड रुल          
* माय डार्लिग लेमन थीम
* गो कुक युवरसेल्फ          
* स्पून फोर्क बेकन
* किस माय स्पॅटय़ुला         
* बॉन अपेटमन्ट (अटेम्प्टचा अपभ्रंश)
* बेकड ब्राय                     
* हॅपी योकस
* सोलाकी फॉर द सोल

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2014 4:14 am

Web Title: big trend of food porn
टॅग : Thats It
Next Stories
1 यंत्रांच्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा शोध
2 उष:काल होता होता.
3 अर्ध्यावरती डाव मोडला!