मूळ आइस बकेट चॅलेंज हे अमायट्रोपिक लॅटरल स्क्लेरॉसिस हा रोग झालेला आहे त्यांना मदत करण्यासाठी असून या रोगाला ‘लाव गेहरिग डिसीज’ किंवा ‘मोटर न्यूरॉन डिसीज’ असेही म्हटले जाते. ब्रिटनमधील ज्येष्ठ विश्वरचना शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांना हा विकार असून त्यांना बादलीभर बर्फ अंगावर ओतून घेणे शक्य नसल्याने त्यांनी त्यांच्या मुलांना हे आव्हान स्वीकारण्यास सांगितले आहे. या मोहिमेनंतर मोटर न्यूरॉन डिसीज रुग्णांसाठी सात दिवसांत १०० दशलक्ष डॉलर मदत गोळा झाली आहे. हॉलीवूड सेलिब्रेटी ऑपरा विनफ्रे, लेओनाडरे डी कॅप्रियो यांनी आइस बकेट चॅलेंजमध्ये भाग घेतला.