06 July 2020

News Flash

सोशल नेटवर्किंगची पहिली निवडणूक

जग बदलत चाललंय त्याचबरोबर जगाकडे पाहण्याची साधने बदलत चालली आहेत. अरब क्रांती सोशल नेटवìकग साधनांमुळे झाली हे अर्धसत्य आहे कारण क्रांती आधी मनात व रक्तात

| May 3, 2014 02:03 am

जग बदलत चाललंय त्याचबरोबर जगाकडे पाहण्याची साधने बदलत चालली आहेत. अरब क्रांती सोशल नेटवìकग साधनांमुळे झाली हे अर्धसत्य आहे कारण क्रांती आधी मनात व रक्तात जन्मावी लागते. लोकांना केवळ एकत्र येण्याचे एक साधन म्हणून फेसबुक, ट्विटर वगरे साधनांनी भूमिका पार पाडली असेल यात शंका नाही परंतु याचा अर्थ ती संपूर्ण क्रांतीच या माध्यमांनी घडवून आणली असे म्हणता येणार नाही.
फक्त लोकांना एकत्र आणण्याचे ते साधन ठरले. भारतात सोशल नेटवìकग माध्यमे वयात येत असताना होत असलेली सार्वत्रिक निवडणूक ही अशा प्रकारची भारतातील पहिलीच निवडणूक
आहे यात शंका नाही. भारतीय निवडणुकांच्या बातम्यांचे, त्यांच्या प्रसाराचे रंग, ढंग त्यामुळे बदलून गेले. पूर्वी रिक्षातून फिरून
प्रचार केला जायचा, कार्यकत्रे विश्वासू असायचे आता पतंगबाजी सुरू आहे.

ओबामांमुळे इंटरनेट साधनांच्या वापराची प्रेरणा
माध्यमांनी या निवडणुकीत भरपूर पसा मिळवला यात
शंकाच नाही कारण हा तर त्यांच्यासाठी पाच वर्षांनी येणारा कुंभमेळा असतो. यंदाची निवडणूक ही वाढत्या मध्यमवर्गाची होती हे तर खरेच पण त्याचवेळी स्मार्टफोनचे दर स्पध्रेमुळे कमी झाल्याने ट्विटर, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप ही साधने तरुणपिढीच्या हातात आली, त्यामुळे सोशल मीडियाच्या वापराचीही होती. अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामा यांनी त्यांची अध्यक्षीय निवडणूक २०१२ मध्ये इंटरनेटच्या माध्यमातून लढवली. त्यामुळे भाजपने प्रथमच हा मार्ग पत्करला. तंत्रज्ञानाचे व्यक्तीकरण झाले. मग प्रचारासाठी ही साधने वापरली तर थेट हृदयालाच हात घालता येईल या समजातून नरेंद्र मोदी यांच्यापासून आम आदमी पक्षापर्यंत सर्वानीच त्याचा वापर करून घेतला पण त्याचा उपयोग किती झाला हे मे महिन्यात दिसेलच. आकडय़ात सांगायचे तर ८१५ दशलक्ष लोक मतदानास पात्र होते. त्यातील १०० दशलक्ष लोक प्रथमच मतदान करीत होते. जे प्रथमच मतदानाला जाणार होते त्यांना ट्विटर, फेसबुक यांची साथ होती.

नव्या स्वरूपातील ग्राफिटी
ग्राफिटीसारखा वस्तुस्थितीवर बोट ठेवणारा  विनोद सर्वानी वाचून हसायचं. काहींना व्हॉटेसअ‍ॅप वरच्या या निखळ अभिव्यक्तीमुळेही कारवाईस तोंड द्यावे लागू शकते. आपल्या तरुण पिढीची अन् त्यांच्या सोशल नेटवìकग साधनांच्या वापराची गोष्ट अशी वाजत गाजत सुरू असली, तरी अजेंडा सेटिंग थिअरी खरी मानली तर त्याचा लोकांच्या मतावर किती परिणाम झाला असा विचार केला, तर उत्तर कदाचित वेगळे येईल पण मतदानाबाबत जनजागृती करण्यात सोशल नेटवìकग संकेतस्थळांनी हातभार लावला यात शंका नाही. स्मार्टफोनने तंत्रज्ञान किफायशीर व वापरण्यास सोपे झाले आहे. त्यासाठी डेस्कटॉपवर जावे लागत नाही, त्यामुळे वेळेची बंधने संपली आहेत, अफवा असेल तर अफवा, बातमी असेल बातमी व्हायरल होऊ शकते हे प्रथमच पाहायला मिळाले. व्हायरल म्हणजे जंतूसंसर्गासारखा प्रसार पूर्वी जंगम स्टाइल, कोलावरी डी या दृश्यफितींचा झाला होता तसा येथे बातम्यांचा (लिखित मजकूर व छायाचित्रांचा) चक्क व्हायरल प्रसार झाला. आता हे ध्यानात आल्यानंतर चाणाक्ष फेसबुकने त्यांचे न्यूजवायर हळूच या निवडणुकीच्या निमित्ताने चालू केले आहे.

मोदी-गांधी घराणे लढत-सीएनएन
 ‘सीएनएन’नेही या निवडणुकीला भारताची पहिली सोशल मीडिया निवडणूक म्हटले आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार फेसबुकवर मोदी यांना ट्विटरवर ३० लाख अनुयायी आहेत, याचा अर्थ ते लोकप्रिय आहेत असा होतो पण त्याचे प्रतिबिंब मतात पडते का हे कळायला वेळ आहे.  ही निवडणूक म्हणजे नेहरू-गांधी घराणे व लोकप्रिय िहदू राष्ट्रवादी नेते मोदी यांच्यातील लढत आहे अशी टिप्पणीही सीएनएनने केली आहे. भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षांचे भवितव्य त्यात पणाला लागलेले असते. मित्रांनो, या सगळ्यात आपल्या लाइकस व ट्विट्सवरून बरेच निष्कर्ष बांधले जाणार आहेत, हे या कंपन्यांना माहीत होते त्यामुळे खोटे लाइकस काढून टाकण्याची खबरदारी निदान फेसबुकसारख्या कंपन्यांनी घेतली होती. या निवडणुकीचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे ‘सब कुछ दिखता हैं’ हे होते. अगदी पसे वाटतानाच्या ध्वनिचित्रफिती व्हॉट्सअ‍ॅपवर दिसत होत्या. पसे पकडल्याच्या बातम्या येत होत्या. माहितीचे इतके खुले प्रसारण यापूर्वी कधी झाले नसेल कारण बातमी कुणी तरी समजा दाबली तरी ती दुसरीकडे कुठेतरी डोके वर काढीत होतीच. त्यातील काही अनेक बातम्या खऱ्या होत्या, म्हणजे बातम्या प्रसारणाचे माध्यम या वेळी केवळ वृत्तपत्रे नव्हती हे येथे ध्यानात घेतले पाहिजे. ‘बीबीसी’नेही भारतातील निवडणुकांच्या बातम्या व्हॉट्सअ‍ॅपवरून दिल्या. महाराष्ट्रात काही वार्ताहरांनी तर चक्क बातम्या पूर्ण टाइप केलेल्या रूपात फेसबुक व्हॉट्सअ‍ॅपवर टाकल्या. याचा अर्थ आता ते प्रसारणाचे माध्यम बनले आहे. विनोद तर इतके पसरवले गेले, की हसून मुरकुंडय़ा वळाव्यात. माध्यमे करमणूक करतात हे त्याचे गुणवैशिष्टय़ येथेही सिद्ध झाले.

सोशल मीडियावर ब्रेकिंग न्यूज
दिल्लीत तर एका मुलीने असे म्हटले आहे, की मोदींचा विवाह झालेला आहे हे मला प्रथम व्हॉट्सअप वर समजले याचा अर्थ तिने रेडिओ, टीव्ही, वृत्तपत्रे, ऑनलाइन संकेतस्थळे पाहण्यापेक्षा व्हॉट्सअ‍ॅप पाहिले त्यात तिचा दोष नाही. तिने पूर्वीची काही नियतकालिके चाळली असती, तर हा सगळा किस्सा तिला कळला असता पण फार विस्ताराने वाचावे लागले असते इतकेच. दिग्गीराजांचे म्हातारपणी बोहोल्यावर चढण्याचे वृत्त ट्विटरनेच दिले. वृत्तवाहिन्यांना स्पर्धा करील
अशी चपळ अ‍ॅप्स आता आहेत. त्यात काही दोष आहेत ते दूर होतील. २००९ मध्ये अमेरिकेतील दोन युवकांनी तयार केलेले व्हॉट्सअप माहिती प्रसारात अशी क्रांती करील असे त्यांना तेव्हा वाटले नसेल. टेलेग्राम हे अ‍ॅप दोन रशियनांनी तयार केले त्यापेक्षा वेगवान आहे पण त्याची वैशिष्टय़े व्हॉटसअ‍ॅप सारखीच आहेत. व्हॉटस अप पेक्षा ते वेगवान आहे पण त्याचा आपल्याकडे फारसा वापर नाही व ते वापरायला सुरक्षित आहे, म्हटले तर या कानाचे त्या कानाला कळत नाही, ज्यांना कळायचे त्यांनाच कळते.इतर माध्यमात जाहिरातींचा, काही वेळा पेड न्यूजचा अडथळा, काहींचे बातम्या देण्याचे वेगळे हेतू, काही जरा कमी तीव्र करून दिलेल्या बातम्या येथे नसतात. सगळे काही अनसेन्सॉर्ड असते.
काही वेळा त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात पण फेसबुक मात्र ‘स्टोरीफुल’ साधनाचा वापर करून
बातम्या खऱ्या बघूनच तुमच्या समोर ठेवणार आहे. थोडक्यात ब्रेकिंग न्यूजचे टीव्हीचे स्थान सोशल
नेटवìकग साइट्स विशेष करून व्हॉटसअ‍ॅपने हिरावून घेतले आहे.

केजरीवालांची क्रेझ
‘सिम्प्लीफाय ३६०’ या सोशल मीडिया कंपनीने तर काही दिवसातला सोशल मीडियाचा अहवालच सादर केला असून त्यांच्या मते भ्रष्टाचार हा ऑनलाइनवर महत्त्वाचा विषय होता. सोशल मीडियावर नरेंद्र मोदी व राहुल गांधी यांच्यापेक्षा अरिवद केजरीवाल यांची क्रेझ जास्त होती. सोशल मीडियावर भ्रष्टाचाराचा मुद्दा असण्याचे कारण म्हणजे त्याचा वापर करणारे लोक हे तरुण, तंत्रज्ञ, शहरी व शिक्षित आहेत.
बीबीसीने वापरले व्हॉटअ‍ॅप
‘बीबीसी’ने संपादकीय मजकूर व्हॉट्सअ‍ॅप व वुई चॅटच्या माध्यमातून उपलब्ध केला आहे पण ‘एपीएआय’मुळे त्याला मर्यादा आहेत व समूह किती आहेत यावर किती जणांना बातम्या किंवा संदेश कळणार हे अवलंबून आहे. ‘बीबीसी न्यूज इंडिया’ने ही सेवा उपलब्ध करून दिली आहे. यात युजर्स जनरेटरेड कंटेट (यूजीसी) वापरलेला आहे. यात पैसे वाचवण्याचा हेतू असला, तरी तो काही वेळा माहिती चुकीची असल्यास अंगाशी येऊ शकतो. ट्विटर व फॅरोल या सोशल नेटवìकग साइट निवडणुकीतील कल, उमेदवार, पक्ष, निवडणूक ट्विट यांची माहिती देत आहेत.

एकतर आता अ‍ॅप हा परवलीचा शब्द झाला आहे. सर्वाकडे अ‍ॅप आहेत म्हणून आम्ही अधिक लोकांपर्यंत जाण्यासाठी विशेष करून गरीब लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपचा वापर केला आहे. अनेकांकडे व्हिडिओ डाउनलोड करण्याइतके डाटा प्लानही नसतात, त्यांना निदान थोडी माहिती मिळाली तरी बरे, हा त्यामागचा
उद्देश आहे.
– ट्रशर बॅरोट, बीबीसी ग्लोबल न्यूज

सोशल मीडियाचा मतदानावर होणाऱ्या परिणामांबाबत फार हुरळून जाण्याचे कारण नाही. भारतात चार पकी एका व्यक्तीने कधीही इंटरनेट वापरलेले नाही, त्यांनी मोबाइल वापरण्यास नुसती सुरुवात केली. सोशल नेटवìकगचा प्रभाव हा सुशिक्षित, शहरी भागात असू शकेल. डिजिटल डिव्हाइडमुळे ऑनलाइन प्रचाराला मर्यादा येतात.
 – प्रणोंजय गुहा ठाकुरता

सोशल मीडियाने राजकारणाचे लोकशाहीकरण केले. यापूर्वी निवडणुका या एकतर श्रीमंत नाहीतर गरीब लोकांच्या नियंत्रणात होत्या आता मध्यम वर्गाला त्याबाबत आस्था निर्माण झाली आहे, सोशल मीडियावर ते बोलू शकतात व चर्चा करू शकतात.
– कपील गुप्ता, ओएमएललॉजिक

‘आयएएमएआयच्या अहवालानुसार सोशल नेटवìकग साइट्समुळे  २४ राज्यांत मतांमध्ये ३ ते ४ टक्के फरक पडू शकतो. मॅकेन्झीच्या अहवालानुसार भारतात इंटरनेटचा प्रसार ग्रामीण भागात शहरी भागापेक्षा एक बारांश आहे.’ सोशल माध्यमांचे महत्त्व वाढले हे खरे आहे पण किती लोक खेडय़ात राहतात व किती लोक अशिक्षित आहेत याचाही विचार करायला हवा
– संजयकुमार, सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपींग सोसायटीज.

यंदाच्या निवडणुकात २००९ च्या तीनपट खर्च अपेक्षित आहे. अमेरिकेतील निवडणुकीत ७ अब्ज डॉलर खर्च झाला होता.
– सेंटर फॉर कम्युनिकेशन स्टडीज

भारतीय निवडणुकातील २ ते ५ टक्के खर्च ऑनलाइन झाला. त्यांनीच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार सोशल नेटवर्किंगचा परिणाम किमान १६० मतदारसंघांवर होईल.
– मोबाइल असोसिएशन ऑफ इंडिया

सोशल नेटवìकगमध्ये सुरुवातीला आम्ही मागे पडलो पण नंतर त्याचा वापर सुरू केला. व्हॉट्सअ‍ॅप वापरणे स्वस्त सोपे असते फक्त त्याच्या गटांच्या संख्येमुळे मर्यादा येतात. लोकांच्या तक्रारी समजण्यास त्यामुळे मदत होते. ट्टिवटर, फेसबुक यांचाही वापर आम्ही केला.
काँग्रेसचे संपर्क सदस्य गौरव पांधी

इंटरनेटच्या महाजालात निवडणुकीसाठी नेमके काय पाहाल..
दूरचित्रवाणीला मागे टाकले मात्र विश्वासार्हतेचा प्रश्न
 ‘इरेिझग डेडलाइन’ हा प्रकार टीव्ही केव्हाही कुठलीही बातमी एक ओळीत देऊ शकतो म्हणून आली पण आता टीव्हीवाल्यांचे याला काय उत्तर असणार आहे. नवमाध्यमांची जी वैशिष्टय़े आहेत. त्यात कुणी आडकाठी करू शकत नाही, ती वापरण्यास सोपी असतात. पेपर वाचत बसावा लागतो, ऑनलाइनवर निदान नजर फिरवावी लागते (त्यात पाने स्कॅन केली जातात, फक्त दहा टक्के वाचली जातात), टीव्ही पुढे बसावे लागते तसे इथे नाही. फक्त संदेश बघायचा एवढेच. याचा फायदा केवळ मतदारांना किंवा सामान्य लोकांना झाला असे नाही तर राजकीय पक्षांनाही त्यांचे कार्यक्रम कुठे आहेत, कुठे काय होणार आहे, कुणाची रणनीती काय आहे याची थोडक्यात माहिती देण्यासाठी झाला. सरकारला मतदार जागृतीसाठी सोशल नेटवìकगचा वापर करता आला. भाजप, आम आदमी पक्ष व काँग्रेस या तीन पक्षांनी व्हॉट्सअ‍ॅपचा वापर केला.

*वेइन- ही सोशल नेटवìकग कंपनी आहे व त्यात स्थानिक व राष्ट्रीय बातम्या निवडणूक संभाषणे दाखववली जातात.
*नेटवर्क १८- मायक्रोसॉफ्टने नेटवर्क १८ बरोबर करार करून सीएनएन आयबीएन इलेक्शन अनॅलिटिक सेंटर तयार केले आहे. त्यात सीएनएन, आयबीएन ७, आयबीएन लाइल्ह यांचा समावेश आहे. दृश्य भाग ग्रॅमेनेर सांभाळत आहे.
*इलेक्शन मायक्रोसाइट- िबगच्या इलेक्शन मायक्रोसाइटवर माहिती उपलब्ध केली जाणार आहे.इंडियन इलेक्शन हे अप िवडोज फोनवर येत आहे व िवडोज 8 टॅबलेट व अँड्रॉइडवर ते बघता येईल.
*सोशल ट्रॅकर २०१४- यात एक ट्रॅकर की आहे. विविध नेत्यांची चर्चा यात आहेत. जिओ हीट मॅप ही सुविधा त्यात आहे
*इलेक्शन एक्स्प्रेस- ‘इंडिया टुडे’ने इलेक्शन एक्स्प्रेस हा लाइव्ह ब्लॉग सुरू केला आहे व त्यात व्हिडिओ आहे. निवडणूक कार्यक्रमाची माहिती व इतरही त्यात आहे.
*इलेक्शन ट्रॅकर- याहू इंडियाने इलेक्शन ट्रॅकर तयार केला आहे, त्यात व्हिडिओ व इनफोग्राफिक्स वापरून बातम्या दिल्या आहेत. यात त्यांनी काही प्रमाणात वार्ताकनावरही भर दिला आहे.
*सोशल समोसा- हा इलेक्शन ट्रॅकर असून ट्टिवटर व वेब यांची माध्यमविषयक माहिती त्यात मिळते. कनेक्ट सोशल हे वार्ताकन साधन त्यात वापरले आहे.
*इंडिया व्होट्स २०१४ –
एनडीटीव्हीच्या इंडिया व्होट्स २०१४ या निवडणूक बातम्या व स्तंभ व व्हिडिओ फिती दाखवल्या आहेत. उमेदवारांची माहिती त्यात दिली आहे. निकालांचीही माहिती त्यात दिली जाईल.
*प्लेज टू व्होट- हा मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी गुगलचा उपक्रम होता. त्यात इलेक्शन हब तयार करण्यात आले होते. प्रथमच मतदान करणाऱ्या मतदारांना आकर्षति करण्यासाठी याचा वापर करण्यात आला.
*इंडिया इलेक्शन २०१४- यात १९४७ ते २०१४ दरम्यान भारतीय लोकशाहीचा इतिहास दिलेला आहे. राजकीय पक्षांची माहिती दिलेली आहे. भारतीय राजकारणाची बरीच माहिती त्यात आहे.
*लाइव्ह इंडिया इलेक्शन रिझल्ट्स- देशातील निवडणुकांचे ताजे निकाल
देणारे हे अॅप आहे.
*इंडिया इलेक्शन – हे उमेदवार व त्यांची ताजी माहिती व बातम्या देणारे अॅप आहे.
*फेसबुक टॉक लाइव्ह- उमेदवारांच्या चर्चा थेट प्रक्षेपण
*फेसबुक  ट्रॅकर- यात किती जण उमेदवाराविषयी चर्चा करतात हे समजत होते.
*फायनान्शियल टाइम्स ब्लॉग
*पिनस्टॉर्म- राजकीय पक्षांनी ऑनलाइनवर काय चर्चा आहे हे जाणून घेण्यासाठी या अॅपचा वापर केला.
*लोकसत्ता व इंडियन एक्सप्रेस ब्लॉग व इलेक्शन काउंटर (निकाल व चर्चासाठी)
*पीआयबी- या सरकारी संकेतस्थळावरही यंदाच्या निवडणुकीबाबत माहिती आहे.

भारतात सोशल मीडिया  वापरकत्रे – १०३ दशलक्ष
*एकूण मतदारांपेक्षा मोबाइलची
  संख्या जास्त म्हणजे – ८१४ दशलक्ष
*फेसबुक वापरकर्ते -९३ दशलक्ष
*ट्विटर वापरकत्रे- ३३ दशलक्ष
(१८-२३ वयोगटातील-७२ दशलक्ष मतदार)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2014 2:03 am

Web Title: first election of social media in india 2
Next Stories
1 गुगलास्ताचा आरंभ ?
2 फीचर घसरण
3 काकबुद्धीची नवकथा!
Just Now!
X