गंभीर ट्रेकर्स, दुर्गप्रेमी, चढाईखोर यांचे प्रस्थ गेल्या दशकभरात खूप वाढले आहे. सह्य़ाद्रीचे कानाकोपरे वीकेण्डी मनोरंजनासाठी सध्या पर्यटकांच्या पाऊलखुणांनी झिजत आहेत. शहरी कोलाहलापासून निसर्गाकडे पळण्याची बेगडी टूम इतकी पराकोटीला गेली आहे, की निसर्गाला शहरी कचऱ्याचे साम्राज्य बनावे लागते की काय, अशी चिंता निर्माण झाली आहे. एव्हरेस्टची मूळ उंची ८८४८ मीटर असली, तरी ५६०० मीटर इतक्या उंचीच्या ठिकाणी बराच गोंगाट आणि शहरी कचऱ्याचा थर व्यापलेला असतो. एकटय़ा एव्हरेस्टलाच नाही, तर देशातील सर्वच पर्यटन स्थळांना हक्काची कचराकुंडी म्हणून पर्यटकांकडून वापरले जात आहे. ‘पर्यटन करू नका’ असे बोलायची वेळ येण्याआधी काही महत्त्वाच्या बाबी पर्यटनप्रेमींसाठी आणि मनमौजेसाठी भटकंती करणाऱ्यांसाठी..
एव्हरेस्टवरील प्रदूषणाची कथा
एव्हरेस्ट हे जगातील उंच शिखर, पण तिथेही कचरा हाच प्रमुख प्रश्न आहे. पॉल थेलेन या ६८ वर्षांच्या वृद्धाने दोनदा एव्हरेस्टला भेट दिली आहे, त्याला तिथली परिस्थिती माहिती आहे. फोनवर तिथे घाण किती आहे याबाबत जराही चिडचिड न करता या माणसाने अनेकदा एव्हरेस्टवर नेहमी जाणारे त्यांचे मित्र एबरबार्ड शाफ यांना अनेकदा ऐकवले आहे. थेलेन यांनी आयुष्यात बरेच काही पाहिले आहे. थेलेन व त्यांचे मित्र शाफ हे नेपाळमध्ये येतात, तेव्हा कचरा साफ केल्याशिवाय राहत नाहीत. एव्हरेस्टवरच्या कचऱ्याची साफसफाई करण्यासाठी खरे तर इको एव्हरेस्ट एक्सपीडिशन, २००८ पासून या उपक्रमात दरवर्षी एव्हरेस्टच्या मार्गावरचा कचरा साफ करण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत या मोहिमेने १३ टन कचरा साफ केला आहे. यंदा सात देशांतील सोळा एव्हरेस्टवीर आता या मोहिमेत येत आहेत. मे महिन्याच्या अखेरीपर्यंत ते स्वच्छता करणार आहे. जुने तंबू, दोरखंडाचा कचरा, काही प्रेते असा कचरा तेथे नेहमीच असतो. तो साफ करण्यासाठीच्या मोहिमेत भाग घेणारे थेलेन हे काही रिकामटेकडे किंवा वेळ जात नाही म्हणून असला उद्योग करणारे व्यक्ती नाहीत. एव्हरेस्ट मोहिमेत सदस्यांसाठी चार छावण्या असतात, तेथून अनेकदा ते व शेर्पा अन्न व साधनसामग्री घेऊन ७२०० मीटरवरच्या तिसऱ्या छावणीवर जातात. परत येताना त्यांच्या पाठीवरच्या पिशव्या रिकाम्या असतात. नायलॉन सॅकही असतात, त्यात १० ते १२  किलो कचरा असतो, त्यात जुन्या दोऱ्या, जुने तंबू असतात, अनेक गिर्यारोहक ही सामग्री तेथेच टाकून देतात. १९९० पासून तिथे कचरा होतो आहे, जेव्हा एव्हरेस्ट हे पर्यटनाच्या दिशेने जाऊ लागले, तेव्हा हे घडले. त्याच वेळी ग्लोबल वॉìमगमुळे तेथे कुंभू हिमनदी वितळू लागली, त्यामुळे घाण सडू लागली. १९६२ पासूनचे टिनचे छोटे डबे तिथे आहेत. आतापर्यंत पाच हजार वेळा तरी एव्हरेस्ट शिखर इ.स. २००० पासून सर केले गेले. हे प्रमाण ८० टक्के आहे.

ऑक्टोफेस्ट  जत्रोत्सवातील स्वच्छतेचा आदर्श
जर्मनीत ऑक्टोफेस्ट नावाचा जगातील सर्वात मोठा महोत्सव म्युनिकमधील वायसन येथे भरतो. सप्टेंबरच्या अखेरपासून तो ऑक्टोबपर्यंत तो चालतो. तिथे दरवर्षी सत्तर लाखांहून अधिक लोक जगभरातून मौजमजेसाठी येतात. या जत्रेला वायसन म्हणतात. बावारियन संस्कृतीचा हा भाग असलेला जत्रोत्सव आहे. इ.स. १८१० पासून तो तिथे होतो आहे. साठ ते सत्तर लाख लोक त्यात हजेरी लावतात, अशा या उत्सवाची व्यवस्थाही तितकीच चोख ठेवलेली आहे. तेथे एक हजार टन कचरा निर्माण होतो, त्याची विल्हेवाट लगेच लावली जाते. तिथे स्वच्छतागृहांमध्ये जायला मोठय़ा रांगा लागतात. त्याचे ट्रॅफिकप्रमाणे नियंत्रण करावे लागते, मोबाइल जॅमर लावून शांतता राखली जाते. तिथे आधी दोन हजारांहून अधिक स्वच्छतागृहे होती, आता तेथे आणखी अठराशे स्वच्छतागृहे बांधली गेली आहेत. आपल्याकडे यात्रा भरतात, तेव्हा तेथील अस्वच्छता कमी करण्यासाठी देवस्थानांनी व सरकारने प्रयत्न करायला पाहिजे, तरच त्यातले मांगल्य टिकून राहील.

पर्यटकांना कचरा खाली नेण्यात अडचण काय आहे..
थेलेन यांना माहीत आहे, की एव्हरेस्टवर काही उंचीवर गेल्यानंतर तुमची सगळी शक्ती ही चढणे व उतरणे यात खर्ची होत असते, त्याशिवाय तुम्हाला दुसरे काही सुचणेच शक्य नसते. ऑक्सिजनची रिकामी सििलडर्स जड असतात, अनेक तंबू बर्फाच्या वादळात उडून जातात. त्यामुळे ते परत आणण्याची ताकद गिर्यारोहकांमध्ये राहत नाही. साधारण ७००० मीटरचा जो टप्पा आहे, तो जीवन-मरण यांच्यातील सीमारेषा पुसून टाकणारा भाग आहे. तिथे अनेक गिर्यारोहक मरण पावलेले आहेत, कारण तिथे त्यांना कुठल्या अडचणीचा सामना करावा लागेल याचा नेम नाही. २००६ मध्ये ११ एव्हरेस्टवीर तेथे मरण पावले व निम्म्यांचे मृतदेह तेथेच पडून राहिले. बेस कॅम्पला मानवी विष्ठा हा एक मोठा प्रश्न आहे. तेथे स्वच्छतागृहे नाहीत असे नाही. तेथे त्यासाठी खास तंबू आहेत, ते रिकामे करावे लागतात. क्लीन माऊंटन कॅन्स या उंचीवरील म्हणजे डेथ झोनमध्ये मूत्र व शौचासाठी वापरल्या जातात. त्याच्या आत बॅग्ज असतात व त्या दर दोन-तीन दिवसांनी रिकाम्या कराव्या लागतात. डेथ झोनमध्ये मानवी पचन मंदावते, त्यामुळे काय होत असेल याचा विचारच केलेला बरा. एव्हरेस्ट मोहिमेत प्रेते परत नेली जात नाहीत, त्यामुळे एव्हरेस्टवीरांना तेथे मरण पावलेल्या, धर्य खचवेल अशा मृत शरीरांना ओलांडूनच मग पुढे जावे लागते. २००७ पासून एव्हरेस्टवर जाण्याच्या प्रत्येक पाच प्रयत्नांतील एक प्रयत्न यशस्वी होतो. २०१० पर्यंत ३१०० लोक एव्हरेस्ट चढून शिखरावर गेले आहेत. थेलेन व शाफ यांनाही पूर्ण एव्हरेस्ट चढण्याची इच्छा आहे; पण सध्या तरी त्यांनी आपले आयुष्य एव्हरेस्टच्या स्वच्छतेसाठी वाहून दिले आहे. एव्हरेस्टवर स्वच्छता करायची म्हणजे तेवढाच आव्हानात्मक विषय आहे.