पंधरा-वीस वर्षांपूर्वीपर्यंत, सुटी म्हटली की बाळगोपाळांची मैदानी खेळापासून बैठय़ा गंमतींपर्यंत आनंदलुटीच्या साधनांची चंगळ होती. टीव्हीही बालमनोरंजक अवस्थेत आलेले नव्हते. आता मात्र टीव्ही आणि कम्प्युटर्सनी मुलांना नॉनस्टॉप मनोरंजनाच्या अगणित संधी उपलब्ध करून दिल्यात. यातील चांगले आणि वाईट काय याबाबत पालकांपासून बालकांपर्यंत टोकाची मतभिन्नता आढळेल. मायाजालाशी सुपरिचित बनलेल्या नव्या पिढीसाठी महिनाभराच्या सुटीत मुलांना छंद, वाचन, खेळ या सगळ्यांची जोपासना करता येईल त्यासाठी त्यांनी वेळेचे नियोजन करायला हवे. पुस्तकाच्या पलीकडेही जग असते ते पाहायला एरवी वर्षभर वेळ नसतो ते पाहण्यासाठी उन्हाळ्याची सुटी ही संधी असते. इंटरनेटच्या जगात मुलांसाठी काय आहे याचा शोध घेऊन, अनेकांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन संकेतस्थळे व अॅपस या लेखात सुचवली आहेत.

ओरिगामी क्लब
हा जपानी कला प्रकार असून एक छंद म्हणूनही तो जोपासता येतो. ज्यांना हे शिकायचे आहे पण शिकण्याची सोय नाही त्यासाठी इंटरनेटवर तुम्हाला त्याची माहिती मिळते व वेगवेगळ्या कला सादरीकरणातून मुलांना स्वत:हून ही कला शिकण्याची संधी मिळते. यासाठी फुले, फळे, प्राणी, चिन्हे यांसारख्या अनेक वस्तू ओरिगामीने तयार करता येतात. कागदाच्या घडय़ा घालत या कलाकृती तयार करता येतात पण त्यासाठीच्या सूचना या संकेतस्थळावर दिल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला विरंगुळाही मिळतो अन् वेळही सार्थकी लागतो  en.origami.club.com

मोकोमी
गमतीदार काही तरी करायचे असेल, तर त्यासाठी मोकोमी सज्ज आहे, यात अॅनिमेशनच्या मदतीने आकार तयार करता येतात. जिगसॉ, पझल, फोटो फ्रेम्स डाऊनलोड करता येतात. मोकोमी हे ऑनलाइन मॅगझिन असून ते सहा महिन्यांसाठी मोफत आहे. त्यात चालकविरहित मोटार, आयपीएल ७ असे अनेक विषय त्यात हाताळले आहेत. संकेतस्थळाचे नाव आहे. macomi.com.

वंडरोपोलीस
मुले नेहमी आई-वडिलांना व शिक्षकांना प्रश्न विचारतात पण त्यांचे हे कुतूहल ‘गप बस रे तू. नंतर सांगेन’ असे म्हणून तेथेच संपवले जाते आता मुलांना असे काही कुणाला विचारायची गरज नाही फार तर शिक्षक व आई-वडिलांची मदत घ्या पण त्यांच्यावर फार अवलंबून राहू नका कारण आता तुमच्यासाठी एक नवीन संकेतस्थळ येथे देत आहोत. त्याचे नाव आहे – wondoropolis.org
या संकेतस्थळावर जा अन् बिनधास्त काहीही प्रश्न विचारा. तुम्हाला कुणी रागावणार नाही. २०१० मध्ये हे संकेतस्थळ अस्तित्वात आले आहे. मुंगीचा मेंदू किती छोटा असतो इथपासून एखाद्याला पाण्यात उचलणे, जमिनीवरून उचलण्यापेक्षा सोपे का असते यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतील. ती वाचून तुम्हाला माहितीबरोबरच ज्ञान मिळेल. घरोघरी ज्ञानेश्वर तयार व्हावेत यासाठी त्यामुळे हातभार लागेल यात शंका नाही. किमान १२०० प्रश्नांची उत्तरे त्यात दिली आहेत. शाळांमध्ये जे परिपाठ अभ्यासप्रकल्प देतात, त्यातही या माहितीचा मुलांना वापर करता येईल. शिक्षकांनीही ते वाचले तर बिघडणार नाही फक्त ते इंग्रजीत आहे त्यामुळे माय मराठीतील मुलांना त्यांनी ते समजून सांगावे, इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांना जास्त सांगावे लागणार नाही. या जगावेगळ्या गोष्टींविषयी मित्रांशी चर्चा करा. ज्ञान लपवून ठेवू नका, ते दिल्याने वाढते.

गंमत व ज्ञानवृद्धी
मुलांसाठी ‘नॅशनल जिऑग्राफिक’चे एक संकेतस्थळ आहे त्यात आपला ग्रह, प्राणी व इतर अनेक गोष्टींत ज्ञानामध्ये भर घालणारी माहिती आहे. काही छान छायाचित्रेही आहेत. संकेतस्थळाचे नाव आहे. http://kids.nationalgeographic.com/kids मुलांच्या ज्ञानात भर टाकणारी व त्यांना वेगवेगळ्या विषयांची माहिती देणारी साइट power my Learning, Ask Kids ही दोन संकेतस्थळे जरूर बघावीत. मुलांचे सर्व प्रकारचे ज्ञान वाढवणारी आयपीएल (http://www.ipl.org)  नावाचे संकेतस्थळही चांगले आहे त्यात संदर्भ साहित्य, आपले जग, वाचन विभाग, गणित-विज्ञान, फन स्टफ, कला व संगीत असे अनेक विभाग आहेत. मुलांना त्यांच्याशी संबंधित बातम्यातही रस असतो त्यांच्यासाठी News for kids  हे संकेतस्थळ आहे.

खेळ
मुलांना ऑनलाइन गेम खेळायला आवडते पण त्यातही चांगली साइट म्हणजे Pogo म्हणजे त्यात कोडी, शब्दकोडी, मोफत ऑनलाइन गेम, चेस, स्पायडर सॉलिटेर व क्रिबेज हे गेम्स आहेत. हेील्ल@ठअरअ ,Women@NASA , http://explore. glacierworks.org /en/,http:// http://www.funbrain.com/,http:// amazing-space.stsci.edu/, http://earthquake. usgs.gov/learn/kids/, http://kids.discovery.com/  जरूर ही संकेतस्थळे बघा.