आपण रोज जी पालकाची भाजी खातो त्या पालकापासून सूर्यप्रकाशाच्या मदतीने इंधननिर्मिती करता येते असे वैज्ञानिकांनी दाखवून दिले आहे. परडय़ू विद्यापीठातील भौतिकशास्त्रज्ञांच्या आंतरराष्ट्रीय गटाने पालकातील प्रथिनांचा अभ्यास केला. ही प्रथिने प्रकाशसंश्लेषण क्रियेत सहभागी असतात. प्रकाशसंश्लेषणात सूर्याच्या ऊर्जेचे रूपांतर काबरेहायड्रेटमध्ये करतात व त्यामुळे पेशींना ऊर्जा मिळते. पालकात फोटोसिस्टीम २ नावाचे एक गुंतागुंतीचे प्रथिन असते. ते वेगळे काढून घेण्यात आले. या प्रक्रियेत पालकाची भाजी बाजारातून विकत आणून ती एका खोलीत सूर्यप्रकाशापासून दूर शीत जागी ठेवली. त्यानंतर वैज्ञानिकांनी त्यावर लेसर किरणांचा मारा केला असता प्रथिनाच्या रेणूंमधील इलेक्ट्रॉनची रचना बदलण्यास सुरुवात झाली. येथे सूर्यप्रकाशाचे काम लेसरने केले. विद्यापीठातील युलिया पुष्कर यांच्या मते लेसरच्या मदतीने प्रथिनांनी काम सुरू केले. त्यानंतर इलेक्ट्रॉन पॅरामॅग्नेटिक रेझोनन्स व क्ष-किरण वर्णपंक्तीमापी यांच्या मदतीने निरीक्षण केले व त्यातून त्यांना रेणूंची इलेक्ट्रॉन रचना बदलताना दिसली. आम्ही शक्तिशाली अशा प्रथिन प्रणालीचा अभ्यास करीत होतो, कारण हे प्रथिन मिळालेल्या सूर्याच्या ऊर्जेचा ६० टक्के भाग रासायनिक ऊर्जेत करत असते, त्यामुळे त्याचे कार्य कसे चालते हे समजल्यावर कृत्रिम प्रकाशसंश्लेषण साध्य करता येते. प्रकाशसंश्लेषणात वनस्पती सौरऊर्जेचा वापर कार्बन डाय ऑक्साईड व पाण्याचा वापर हायड्रोजनमध्ये करतात, त्यामुळे कार्बन डाय ऑक्साईड व ऑक्सिजनमध्ये करतात. कृत्रिम प्रकाशसंश्लेषणात सौरऊर्जेचे रूपांतर पुनर्नवीकरणीय, पर्यावरणस्नेही हायड्रोजन आधारित इंधनात करता येते. फोटो सिस्टीम-२ च्या मदतीने प्रकाशसंश्लेषणाच्या मदतीने पाण्याचे रेणू हे ऑक्सिजन, प्रोटॉन, इलेक्ट्रॉन यांच्यात विभागले जातात. यात ऑक्सिजननिर्मिती करणारे प्रथिन पाच अवस्थांतून जाते. त्यात चार इलेक्ट्रॉन काढून घेतले जातात, असे त्यांनी सांगितले.