डाऊनलोडिंग इंडिया!

भारतात तासाला ५३ टक्के लोक इंटरनेटचा वापर करतात तर जगाची इंटरनेट वापराची सरासरी त्यापेक्षा कमी म्हणजे ५१ टक्के आहे, असे एका आंतरराष्ट्रीय अभ्यासात दिसून आले आहे.

भारतात तासाला ५३ टक्के लोक इंटरनेटचा वापर करतात तर जगाची इंटरनेट वापराची सरासरी त्यापेक्षा कमी म्हणजे ५१ टक्के आहे, असे एका आंतरराष्ट्रीय अभ्यासात दिसून आले आहे.
सतत ऑनलाइन असणे ही आता भारतात नेहमीची बाब झाली असून ५३ टक्के लोक जागेपणी प्रत्येक तासाला इंटरनेटवर असतात, असे लंडनची ग्लोबल मॅनेजमेंट फर्म एटी किर्न ग्लोबल रीसर्चने म्हटले आहे, जगातील इंटरनेट वापराचे प्रमाण ५१ टक्के असून चीनमध्ये ते ३६ टक्के तर जपानमध्ये ३९ टक्के आहे, असे ‘कनेक्टेड कन्झ्युमर्स आर नॉट क्रिएटेड इक्वल-अ ग्लोबल परस्पेक्टिव्ह’ या अहवालात म्हटले आहे. अहवालात दहा देशांतील १० हजार जणांनी जुलैत प्रतिसाद दिला आहे. सततची कनेक्टिव्हिटी असल्याने भारतीय लोक सोशल नेटवर्किंगवर जास्त असतात. ९७ टक्के लोकांनी सांगितले, की आमचे फेसबुक अकाउंट असून रोज त्यातील ७७ टक्के लोक फेसबुक बघतात. आंतरव्यक्ती संज्ञापनासाठी इंटरनेटचा वापर भारतात ९४ टक्के आहे. स्वअभिव्यक्ती हा दुसरा महत्त्वाचा मुद्दा असून त्यासाठी इंटरनेटचा वापर केला जातो. काही देशात अशा प्रकारचा संपर्क कमी आहे. चीनमध्ये ८९ टक्के लोक व्यक्तिगत संपर्कासाठी इंटरनेट वापरतात तर एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी इंटरनेट वापरण्याची जागतिक सरासरी ६२ टक्के आहे. अनेक वस्तू ऑनलाइन खरेदी करण्याची वृत्ती भारतात वाढली आहे. ९२ टक्के लोक ऑनलाइन सेवांचा शॉपिंग व इतर कारणांसाठी लाभ घेतात, असे या अहवालात म्हटले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व Thats इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Downloading india

ताज्या बातम्या