एकीकडे देशभरातील शाळांमध्ये शिकविले जाणारे विज्ञान अत्यंत कंटाळवाणे-निरस असल्याने देशी विज्ञानाला सुंदर भविष्य नसल्याची सत्यवाणी भारतरत्न वैज्ञानिक सीएनआर राव यांनी याच आठवडय़ात मांडली. देशात संशोधन आणि विज्ञानमय पिढी अल्पसंख्येत फुलत आहे. ज्ञानबळावर ती जगभ्रमंती करत आहे. महाराष्ट्र मात्र गेल्या काही वर्षांपासून संशोधन क्षेत्रात मागे पडू लागला आहे. ज्ञानक्षेत्रासाठी सुतराम ओळख नसलेल्या लॉस एंजेलिस येथे जगातील बुद्धिमान विद्यार्थ्यांची एक स्पर्धा नुकतीच भरली होती, मानवाला उपयोगी पडेल असे संशोधन करून दाखवण्याची. भारतातील १८ शाळा त्यात सहभागी होत्या. दरवर्षी भरविल्या जाणाऱ्या या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या नववैज्ञानिकांमध्ये महाराष्ट्र सोडून इतर राज्यांचे वर्चस्व असते. राज्यातील ‘विज्ञाने’श्वरांच्या’ पुढच्या पिढीच्या हाती हे चित्र बदलण्याची संधी आहे. यानिमित्ताने या स्पर्धेविषयी आणि परराज्यातील ‘ज्ञाने’श्वरांविषयी..
देशी विज्ञानेश्वरांच्या सत्यकथा
१९५८ पासून अमेरिकेत राष्ट्रीय विज्ञान स्पर्धा सुरू आहेत. दरवर्षी या स्पर्धेच्या परीक्षणासाठी नोबेल विजेत्या वैज्ञानिकांना बोलावले जाते. यंदा इंटेलच्या ‘इंटरनॅशनल सायन्स अँड इंजिनीयिरग’ या संस्थेच्या वतीने विज्ञान स्पर्धा झाली. एकूण ७८ देशांतील १८०० विद्यार्थ्यांनी या स्पध्रेत आपली बुद्धिमत्ता पणाला लावली होती, त्यात भारतातल्या १८ शाळांनी भाग घेतला होता. त्यात काही भारतीय प्रकल्पांची निवड करण्यात आली. त्यांच्या प्रकल्पाचा लोकोपयोग लक्षात घेतला, तर संशोधकांच्या नव्या पिढीला उत्साहाने कार्य करीत राहण्याची प्रेरणा मिळेल.
* नवी दिल्लीच्या महाराजा अग्रसेन पब्लिक स्कूलच्या अभिषेक वर्मा व दक्ष दुआ या दोघा मुलांनी
शेवटी त्याच्या आऊटपुटचे संस्करण अलगॉरिथम असलेल्या चिपने केल्यावर बोलणाऱ्याला अडचणी असतानाही बोलता येऊ लागले.