जंकफूड हे माणसाला आळशी बनवते. त्यामुळे वजनही वाढते. लॉस एंजलिस येथील कॅलिफोर्निया विद्यापीठात करण्यात आलेल्या संशोधनानुसार वजन जास्त असेल तर लोक लवकर दमतात. आळशी बनतात. अ‍ॅरॉन ब्लेसडेल यांनी ३२ उंदरांवर प्रयोग केले. त्यात त्यांना सहा महिन्यांत दोन जेवणांपैकी एक सकस व दुसरे जंकफूडचे जेवण दिले. तीन महिन्यांत जंकफूडवरच्या उंदरांचे वजन जास्त, तर सकस अन्नावरील उंदरांचे वजन कमी दिसून आले. सकस जेवण लठ्ठपणा वाढवत नाही. जंकफूड लठ्ठपणा वाढवते. उंदरांना एक पट्टी दाबून अन्न किंवा पाणी मिळण्याची व्यवस्था होती. ज्या उंदरांना लठ्ठपणा आला होता त्यांना ते जड जात होते. निरोगी उंदरांना ते सोपे जात होते. काही वेळा जंकफूड घेतले तर चालते असे काही नाही, त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात. जंकफूड हे आळशीपणाचे कारण आहे. एक तर प्रक्रिया केलेल्या फास्ट फूडमुळे दमल्यासारखे होते किंवा जंकफूडमुळे लठ्ठपणा येऊन मग थकवा जाणवतो, असे ब्लेसडेल यांचे मत आहे.