‘ट्रेकडी’ तर्फे येत्या ४ ते ५ मे दरम्यान ‘भैरवगड-कोयना जंगल ट्रेक’चे आयोजन केले आहे. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी पिनाकिन कर्वे (९४२३२१३१५३) यांच्याशी संपर्क साधावा.
किल्ले चढणे स्पर्धा
सागरमाथा गिर्यारोहण संस्थेतर्फे गिर्यारोहक रमेश गुळवे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ५ मे रोजी किल्ले चढणे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाच्या वर्षी लोणावळ्याजवळील राजमाची किल्ल्यावर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी प्रशांत पवार (९८५०६६०४९९), सुधीर निगडे (८०८७४२७५२३) यांच्याशी संपर्क साधावा.
उन्हाळी भटकंती
‘अ जॉयफुल अॅडव्हेंचर्स’ संस्थेतर्फे उन्हाळी भटकंती मोहिमांचे आयोजन केले आहे. यामध्ये १६ ते २८ मे दरम्यान सौरताल , १२ ते २४ जून दरम्यान देवतिब्बा तळ आणि १६ ते ३० ऑगस्ट दरम्यान लेह-लडाख भ्रमंतीचे आयोजन केले आहे. ही सर्व भटकंती निसर्गरम्य, हिमालयाचे दर्शन घडविणारी आहे. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी ९४२२७६९२४२ या क्रमांकावर संपर्क साधावा.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 1, 2013 1:16 am