जंगलात भटकण्याचे वेड आता चांगलेच वाढले आहे. वन्य पशू, पक्षी, वनस्पती, वेली, फळे, फुले, बिया, बुरशी, माती, पाणी, हवा या पर्यावरणातील प्रत्येक घटकांत दडलेले कुतूहल, आकर्षण, जिज्ञासा एखाद्या जंगलाच्या वाटेवर चालू लागलो, की आपोआप तुमच्याशी संवाद साधू लागते. निसर्गाच्या अधिकाधिक जवळ जायला होते. निसर्गाशी, जंगलाशी अशी मैत्री होत असतानाच त्या वेळी जोडीला एखादा अभ्यासक किंवा अभ्यासू पुस्तक असेल तर हिरवाईचे हे नाते अधिक घट्ट होते. रमण कुलकर्णी हे असेच एक अभ्यासक आणि त्यांनी लिहिलेले ‘सह्य़ाद्री व्याघ्र प्रकल्पातील जैवविविधता’ हे पुस्तकही असेच बोट धरून जंगल फिरवणारे.
नव्याने जाहीर झालेल्या सह्य़ाद्री व्याघ्र प्रकल्पाच्या पाश्र्वभूमीवर त्यांनी हे मराठी आणि इंग्रजी भाषेतून पुस्तक लिहिले आहे. महाराष्ट्र शासनाच्या वन्यजीव विभागाने नुकताच या पुस्तकाचा पहिला भाग प्रकाशित केला. सह्य़ाद्री व्याघ्र प्रकल्प, त्यातील चांदोली आणि कोयना अभयारण्यांची सामान्य ओळख करून दिल्यावर लगेच हे पुस्तक इथल्या जैवविविधतेकडे वळते. यामध्ये या पहिल्या भागात सह्य़ाद्रीतील रानफुले, पक्षी, फुलपाखरे आणि सस्तन प्राण्यांची माहिती देण्यात आलेली आहे. या प्रत्येक उपभागात मग त्या वन्यजीवाची माहिती आणि सोबत अत्यंत वेधक अशा रंगीत छायाचित्रांची जोड देण्यात आली आहे.
अगदी रानफुलांमध्ये भटकंती करू लागलो, की काटेसावरपासून ते मदामपर्यंत आणि अंजनीपासून कापरूपर्यंत अनेक रानफुलांचे सौंदर्य इथे उलगडत जाते.
पक्ष्यांची दुनियाही अशीच मजेशीर! पश्चिम घाटात आतापर्यंत ५०० प्रजातींच्या पक्ष्यांची नोंद झाली आहे. यातील २७५ जातीचे पक्षी सह्य़ाद्री व्याघ्र प्रकल्पात आढळतात. निलगिरी वृक्ष कबूतर, मलबारी पोपट, मलबारी चंडोल, राखी डोक्याचा बुलबुल, तांबूस सातभाई, पांढऱ्या पोटाचा नाचरा, मलबारी धनेश, मलबारी मैना, लांब शेपटीचा स्वर्गीय नर्तक असे असंख्य पक्षी लक्ष वेधून घेतात. पक्षी निरीक्षण कसे कुठे करावे याची माहितीही कुलकर्णी इथे करून देतात.
फुलपाखरांच्या जगातही अशीच रंगीबेरंगी दुनिया पुढय़ात येते. तब्बल १२१ जातींच्या फुलपाखरांची सचित्र ओळख या पुस्तकात करुन देण्यात आलेली आहे. ब्लू ऑकलिफ, सदर्न बर्डविंग, तमिल लेसविंग, तमिल योमन अशी प्रदेशनिष्ठ फुलपाखरेही इथे भेटतात. अगदी १५ मिलिमीटर पासून ते १९० मिलिमिटर पर्यंत आकाराची ही फुलपाखरे आहेत. सस्तन प्राणी तर या जंगलाचा आत्माच! या परिक्षेत्रात आढळणाऱ्या ३६ हून अधिक सस्तन प्राण्यांची ओळख या पुस्तकात होते. विरळ जंगलात सहजतेने वावरणारा बिबटय़ा, कळपाने राहणारी रान कुत्री, रानमांजर, कोल्हा, तरस, सांबर, गवा, भेकर अशी ही वन्यजीवांची साखळी एकापाठी एक उलगडत जाते. वाघ तर या जंगलाचा राजा! इथल्या जंगलात बसवलेल्या छुप्या कॅमेऱ्यात त्याचे अस्तित्व सिद्ध झाले आणि त्यामुळे या साऱ्या प्रदेशाला ‘सह्य़ाद्री व्याघ्र प्रकल्पा’चा दर्जा बहाल झाला.
पुस्तकाचा आगामी दुसरा खंडही लवकरच प्रसिद्ध केला जाणार असून त्यामध्ये सह्य़ाद्रीतील सरपटणारे जीव, ऑर्किडस्, कीटकांची माहिती दिली जाणार आहे.
जंगलातील प्रत्येक पाऊल हे मजेशीर असते. माहिती-कुतूहलाने भरलेले, नवे जग दाखवणारे असते. अशावेळी त्या-त्या भागाचे असे ‘फिल्ड गाईड’ आपल्या सोबत असले की ते जंगल जास्त बोलके होते. रमण कुलकर्णींचा हा अभ्यासू सहवास सह्य़ाद्रीत फिरताना असाच मार्गदर्शन करतो. (पुस्तकासाठी संपर्क : रमण कुलकर्णी – ९८२२६७४८२२)
  

forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
moong dal scrub for glowing skin
Skin Care Tips: मुग डाळीचा असा वापर कराल तर खऱ्या वयापेक्षा दिसाल लहान व तरुण; सुरकुत्या, पिंपल्सही होतील दूर!
Holi 2024, Natural Colors, Children, Celebrate, Harmful Chemicals, parents, caring tips, skin, eye, infection,
होळीतील रासायनिक रंगाने डोळे, त्वचेच्या आजाराचा धोका! मुलांची विशेष काळजी घेण्याची गरज
Radish recipe
बटाट्याचे काप नेहमी खाता, एकदा मुळ्याचे काप खाऊन तर पाहा, नोट करा सोपी रेसिपी