साहसाच्या जगात गिर्यारोहण, गिरिभ्रमण, सायकलिंग, नौकानयन, पॅराजंपिंग या अशा खेळांबरोबरच उमद्या अश्वांच्या सोबतीने सुरू असलेला एक क्रीडाप्रकार म्हणजे अश्वारोहण! जातीचे घोडे आणि हाडाचे प्रशिक्षक या आधारे हा साहसी छंद जोपासता येतो. आता सुरू होणारी उन्हाळय़ाची सुटी तर हा छंद जोपासण्यासाठी खूप चांगली संधी आहे. यासाठीच पुण्यातील ‘दिग्विजय प्रतिष्ठान’ने या सुटीत अश्वारोहण प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन केले आहे. संस्थेचे पुण्यातील आंबेगाव येथील शिवसृष्टीत प्रशिक्षण केंद्र आहे. इथे उमदे घोडे आणि तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या मदतीने घोडेस्वारीचे प्रशिक्षण दिले जाते. या शास्त्रोक्त प्रशिक्षणातून तयार झालेल्या घोडेस्वारांच्या स्पर्धा घेतल्या जातात, मग पुढे यातील निवडक घोडेस्वारांच्या विविध गडकोटांवर मोहिमा काढण्यात येतात. या शिबिरामध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी अधिक माहितीसाठी गुणेश पुरंदरे (९८२२६२१०१६, ९५५२५६४४७८) यांच्याशी संपर्क साधावा.