पेंच सफारी

पेंच हे मध्य प्रदेशातील एक महत्त्वाचा व्याघ्र प्रकल्प. प्रियदर्शनी व्याघ्र प्रकल्प असे नाव असलेल्या या जंगलास इथून वाहणाऱ्या पेंच नदीमुळे पेंच व्याघ्र प्रकल्प असेही म्हणतात. या जंगलाची व्याप्ती ७५८ चौरस किलोमीटरची आहे. या जंगलात ऐन, हळदु, तेंदू, हिरडा, अमलताश अशा अनेक प्रकारच्या वृक्षांनी समृद्ध जंगल आहे. या जंगलात वाघांशिवाय बिबटय़ा, अस्वल, चितळ, सांबर, कोल्हा आदी प्राणी, तसेच २०० हून अधिक प्रजातींचे पक्षी पाहण्यास मिळतात. ‘निसर्ग टूर्स’च्या वतीने तज्ज्ञांच्या मदतीने २ ते ४ मार्च २०१६ दरम्यान मध्य प्रदेशातील या जंगल सफारीचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी विनोद काठे (९८७००८५०६२) यांच्याशी संपर्क साधावा.

महिलांसाठी ताडोबा जंगल भ्रमंती

जागतिक महिला दिनाच्यानिमित्ताने ‘निसर्ग सोबती’ तर्फे येत्या ९ ते ११ मार्च दरम्यान महिलांसाठी ताडोबा व्याघ्र प्रकल्प सहलीचे आयोजन केले आहे. या जंगलात वाघांबरोबरच बिबटय़ा, सांबर, चितळ,अस्वल, गवा, रानडुक्कर, नीलगाय आदी प्रमुख प्राणी इथे आढळतात. याशिवाय २५० हून अधिक प्रजातीच्या पक्ष्यांचे इथे दर्शन घडते. या सहलीत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी अभय जोशी (९९३०५६१६६७.) यांच्याशी किंवा अशिवनी आठवले (९०२९५३५२०९) यांच्याशी संपर्क साधावा.

कान्हा सफारी

‘वाइल्ड डेस्टिनेशन’तर्फे जागतिक महिला दिनाच्यानिमित्ताने येत्या ११ ते १४ मार्च दरम्यान मध्य प्रदेशातील कान्हा येथे जंगल सफारीचे आयोजन केले आहे. या जंगलात वाघ, बिबटय़ा, गवा, अस्वल, चितळ, सांबर, कोल्हा आदी प्राणी तसेच २०० हून अधिक प्रजातींचे पक्षी पाहण्यास मिळतात. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी अमित भुस्कुटे (९८१९२१५१२७) यांच्याशी संपर्क साधावा.