ढाक-बहिरी मोहीम
‘एसपीआर हायकर्स’तर्फे रविवार,  ५ जानेवारी २०१४ रोजी ढाक बहिरीगड मोहिमेचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी शिल्पा (९९२०३६०३३६), राजेंद्र (८६९१८३७८३३) यांच्याशी संपर्क साधावा.
रतनगड मोहीम
‘आसमंत’ संस्थेतर्फे येत्या ४ ते ५ जानेवारी २०१४ रोजी भंडारदरा परिसरातील रतनगड किल्ल्यावर पदभ्रमण मोहिमेचे आयोजन  केले आहे. तसेच संस्थेतर्फे  १८ ते १९ जानेवारी दरम्यान रायगड दुर्गदर्शन मोहिमेचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी संतोष भिडे (९९३०६६०७३१) यांच्याशी संपर्क साधावा.
लिटिल रण ऑफ कच्छ
‘जीविधा’ संस्थेतर्फे येत्या १२ ते १६ फेब्रुवारी दरम्यान धाकटय़ा कच्छ रणाच्या भ्रमंतीचे आयोजन केले आहे. ‘लिटिल रण ऑफ कच्छ’ नावाने ओळखला जाणारा हा भाग अहमदाबादपासून ११० किलोमीटर अंतरावर आहे. हे एक पक्षीतीर्थ  म्हणून ओळखले जाते. या भागात गोडय़ा पाण्याची तळी, खाडीचे खारट पाणी अशी पाणथळीच्या अनेक जागा पाहावयास मिळतात. या पाणथळींवर येणारे हजारोंच्या संख्येने येणारे फ्लेमिंगो ऊर्फ रोहित पक्षी, क्रेन्स, विविध जातीची पदके, बगळे, करकोचे, घुबड, गरुड आढळतात. हा प्रदेश संरक्षित अभयारण्य आहे. इथे पक्ष्यांशिवाय रानडुक्कर, नीलगाय, रानमांजर, वाळवंटी कोल्हा आदी प्राणीही दिसतात. या जंगलभ्रमंतीच्या जोडीनेच मोढेरा येथील सूर्यमंदिर आणि पाटण येथील ‘राणी की बाव’ या सातमजली विहिरीलाही भेट दिली जाणार आहे. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी वृंदा पंडीत (९४२१८३२९१२) यांच्याशी संपर्क साधावा.
भीमगड जंगल पदभ्रमण
गोवा आणि कर्नाटकच्या सीमेवर भीमगड किल्ला आणि त्याच्या भवतालचा परिसर संरक्षित राखीव जंगल आहे. येथील बारपेडे गुहांमध्ये शेपूट असलेली रॉबटन्स जातीची वटवाघळे पाहण्यास मिळतात. या शिवाय सांबर, ठिपक्यांचे  हरिण, अन्य वन्यप्राणी आणि पक्षी इथे दिसतात. अशा या भीमगड परिसरात ‘हिमगिरी ट्रेकर्स’तर्फे  पदभ्रमणाचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी संतोष (९८२०९४७०९२) यांच्याशी संपर्क साधावा.
अन्नपूर्णा बेस कॅम्प ट्रेक
अन्नपूर्णा हे जगातील १० उंच शिखरांपैकी एक असून त्याची उंची ८०९१ मीटर (२६ हजार ७०० फूट) आहे. नेपाळमधील या शिखराच्या पायथ्यापर्यंत जाणारा ‘अन्नपूर्णा बेस कॅम्प’ हा हिमालयातील एक प्रसिद्ध ट्रेक आहे. हिमच्छादित डोंगर-दऱ्या, झाडी-जंगल, छोटी-छोटी गावे, नद्या-घरे यामधून जाणारा हा ट्रेक वेगळ्याच जगात घेऊन जातो. अशा या ट्रेकचे ‘हिमगिरी ट्रेकर्स’तर्फे १२ ते १८ मे २०१४ दरम्यान आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी संतोष ९८२०९४७०९२ यांच्याशी संपर्क साधावा.
वेळास, सुवर्णदुर्गची भटकंती
‘निसर्ग दर्शन’ तर्फे येत्या ४, ५ जानेवारी रोजी वेळास, बाणकोट, आंजल्र्याचा गणपती, हर्णे बंदर, सुवर्णदुर्ग किल्ला, गोवा किल्ला आदी ठिकाणी भटकंतीचे आयोजन केले आहे. अधिक माहिती आणि तपशीलासाठी चंद्रशेखर शेळके (९८५०२६२६५७) यांच्याशी संपर्क
ताडोबा जंगल सफारी
‘निसर्ग सोबती’तर्फे येत्या २६ ते २८ फेब्रुवारी दरम्यान ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या सफारीचे आयोजन केले आहे. या जंगलात वाघांबरोबरच बिबटय़ा, गवे, सांबर, चितळ, वानर, भेकर, मगरींसह अन्य प्राणीही दिसतात. नवरंग, स्वर्गीय नर्तकसारखे अनेक दुर्मिळ पक्षी या जंगलात दिसतात. अधिक माहितीसाठी अभय जोशी (९९३०५६१६६७) यांच्याशी संपर्क साधावा.
अलंग, कुलंग, मदनची चढाई    
पनवेल येथील निसर्गमित्र संस्थेतर्फे येत्या २६ ते २९ डिसेंबर दरम्यान सर्वोच्च शिखर कळसूबाई, अलंग, कुलंग आणि मदन गटकोटांची पदभ्रमण मोहीम आयोजित केली आहे. हे तीनही दुर्ग सह्य़ाद्रीचे रोद्र रूप धारण केलेले आहेत. यांच्या वाटा भटक्यांना नित्य आव्हान देणाऱ्या असतात. या मोहिमेत सहभागी होण्यासाठी धनंजय मदन (९९८७२९०७५९) यांच्याशी संपर्क साधावा.
बांधवगड अभ्यास सहल
भारतामध्ये ६६८ संरक्षित राष्ट्रीय उद्याने आहेत. त्यात २८ संरक्षित व्याघ्र प्रकल्प आहेत.  मध्य प्रदेशमधील बांधवगडचे जंगल यातीलच एक. भारतीय वन्यजीवनाचा मानबिंदू असलेल्या पट्टेरी वाघासाठी हे बांधवगड राष्ट्रीय उद्यान प्रसिद्ध आहे. १९६८ मध्ये राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा मिळालेल्या या प्रकल्पात तब्बल १४८ हून अधिक वाघ आहेत. या शिवाय बिबटय़ा, रानकुत्री, गवे, चितळ, भेकर, सांबर, वानर, अस्वल, कोल्हे, रानडुक्कर असे अन्य वीसहून अधिक प्रकारचे सस्तन प्राणी या जंगलात आढळतात. जवळपास २५० हून अधिक पक्ष्यांच्या प्रजातींची या जंगलात नोंद घेण्यात आली आहे. बांबूची बने, विस्तीर्ण पसरलेली कुरणे यामुळे बांधवगडच्या जंगलाला अनोखी दृश्यमानता प्राप्त  झाली आहे. अशा या बांधवगडच्या अभ्याससहलीचे ‘हिरवाई’ या संस्थेतर्फे आयोजन  करण्यात आले आहे. २४ ते २९ मे २०१४ या कालावधीत होणाऱ्या या सहलीत वन्यजीव अभ्यासक, नामांकित वन्यजीव छायाचित्रकार सौरभ महाडिक मार्गदर्शन करणार आहेत. वन्यजीवनदर्शन आणि अभ्यास, त्यांचे छायाचित्रण आणि आपला नैसर्गिक वारसा अशा व्यापक अंगाने या सफारीत चर्चा- मार्गदर्शन घडणार आहे. या जंगलभ्रमंतीत भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी ९६१९७५२१११ किंवा ९६१९२४२८९७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.