प्रबळगडवरील थरार
पनवेल येथील ‘निसर्गमित्र’ संस्थेतर्फे येत्या २५ ते २६ जानेवारी दरम्यान प्रबळगड किल्ल्याशेजारील कलावंतिणीच्या सुळक्यावर एका आगळय़ावेगळय़ा मोहिमेचे आयोजन केले आहे. या सुळक्याच्या पोटात एक ६० फूट लांबीचे आरपार छिद्र आहे. नेढेसदृश अशा या बोगद्यातून आरपार जाता येते. परंतु तिथे जाण्यासाठी अगोदर शंभर फुटांचा कडा चढावा लागतो. यासाठी दोराची मदत घ्यावी लागते. यानंतर सरपटत हे छिद्र पार करावे लागते. यानंतर या बोगद्याच्या दुसऱ्या टोकावर पोहोचल्यावर तिथून दीडशे फूट रॅपलिंग करत कडा उतरावा लागतो. अशा या थरारात ज्यांना सहभागी व्हायचे आहे, त्यांनी सुरेश रिसबुड (७७१८८३८३१८) यांच्याशी संपर्क साधावा.

अपरिचित दुर्गाच्या छायाचित्रांचे प्रदर्शन
जनसेवा समिती, विलेपार्ले या संस्थेच्या वतीने येत्या २५ आणि २६ जानेवारी रोजी अपरिचित दुर्गाच्या छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित केले आहे. या प्रदर्शनात साल्हेर, सालोटा, कांचन, मांचन, पेमगिरी, अंकाई-टंकाई, मृगगड, औसा, परंडा, रेवदंडा, चावंड आदी अपरिचित ६० दुर्गाची छायाचित्रे मांडली जाणार आहेत. याशिवाय संस्थेच्या कार्यकर्त्यांना भ्रमंती रायगडावर मिळालेल्या काही दुर्मिळ वस्तूही या वेळी मांडल्या जाणार आहेत.  हे प्रदर्शन गोखले सभागृह, लोकमान्य सेवा संघ (टिळक मंदिर), विलेपार्ले पूर्व येथे सकाळी साडेदहा ते रात्री साडेआठ पर्यंत खुले राहणार आहे.

प्रतापगड मोहीम
‘आनंदयात्रा’तर्फे येत्या २५ आणि २६ जानेवारी रोजी प्रतापगड आणि जावळीच्या खोऱ्यातील भटकंतीचे आयोजन केले आहे. या सहलीमध्ये वाई, महाबळेश्वर, रणतोंडीचा घाट, प्रतापगड आणि जावळीच्या जंगलात भटकंती केली जाणार आहे. अधिक माहितीसाठी उमेश धालपे (९६०४५५२६५३) यांच्याशी संपर्क साधावा.

पक्षिनिरीक्षण सहल
‘निसर्ग सोबती’तर्फे १६ ते २२ मार्च दरम्यान अरुणाचल प्रदेश येथील मिश्मी हिल्स येथे पक्षिनिरीक्षण सहलीचे आयोजन केले आहे. या सहलीत शेकडो प्रजातींचे पक्षी दिसतात. याशिवाय फुलपाखरे आणि कीटक पाहण्यास मिळतात. याशिवाय विविध जातींच्या वनस्पतीही या जंगलात आहेत. अधिक माहितीसाठी अभय जोशी (९९३०५६१६६७) यांच्याशी संपर्क साधावा.

मोराची चिंचोली, निघोजची निसर्ग सहल
‘निसर्ग टुर्स’तर्फे येत्या २२, २३ फेब्रुवारी दरम्यान पुणे जिल्हय़ातील मोराची चिंचोली, निघोज येथे निसर्ग सहलीचे आयोजन केले आहे. मोराची चिंचोली हे एक निसर्गरम्य असे स्थळ आहे. या गावात शेकडो झाडे आणि मुक्तपणे हिंडणारे मोर आढळतात. निघोज येथे कुकडी नदीच्या पात्रात प्रसिद्ध रांजणखळगे पाहण्यास मिळतात. निसर्गातील हे दोन्ही आविष्कार पाहण्यासाठी या सहलीचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी विनोद काठे (९८७००८५०६२) यांच्याशी संपर्क साधावा.