12 December 2019

News Flash

ट्रेक डायरी

एसपीआर हायकर्स’तर्फे येत्या २१ आणि २२ नोव्हेंबर रोजी सांदण पदभ्रमण मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.

‘प्लस व्हॅली अ‍ॅडव्हेंचर्स’तर्फे येत्या येत्या २२ नोव्हेंबर रोजी कळकराय सुळका प्रस्तरारोहण मोहिमेचे आ़ोजन केले आहे.

सांदण मोहीम
‘एसपीआर हायकर्स’तर्फे येत्या २१ आणि २२ नोव्हेंबर रोजी सांदण पदभ्रमण मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी शिल्पा चिमट (९९२०३६०३३६) आणि राजेंद्र जाधव (८६९१८३७८३३) यांच्याशी संपर्क साधावा.

कळकराय सुळका प्रस्तरारोहण
‘प्लस व्हॅली अ‍ॅडव्हेंचर्स’तर्फे येत्या येत्या २२ नोव्हेंबर रोजी कळकराय सुळका प्रस्तरारोहण मोहिमेचे आ़ोजन केले आहे. या मोहिमेत सहभागी होण्यासाठी व अधिक माहितीसाठी श्रीपाद (८३८००५४९८८) किंवा प्राजक्ता (८३८००५४९८९) यांच्याशी संपर्क साधावा.

नागझिरा जंगल भ्रमंती
ताडोबाबरोबरच नागझीरा हे देखील महाराष्ट्रातील वाघांसाठी प्रसिद्ध असलेले जंगल आहे. आर्द-पानगळीच्या या जंगलात बांबू, ऐन, मोह, कांडेळ, धावडा, काटेसावर आदी प्रमुख वृक्ष आहेत. वाघांबरोबरच बिबटय़ा, सांबर, चितळ, वानर, अस्वल, गवा, रानडुक्कर, नीलगाय आदी प्रमुख प्राणी इथे आढळतात. याशिवाय २०० हून अधिक प्रजातींच्या पक्ष्यांचे इथे दर्शन घडते. अशा या जंगलाच्या अभ्यास सहलीचे ‘निसर्ग टूर्स’ तर्फे ३ ते ७ डिसेंबर या कालावधीत आयोजन केले आहे. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी विनोद काठे (९८७००८५०६२) यांच्याशी संपर्क साधावा.

First Published on November 19, 2015 6:45 am

Web Title: loksatta trek diary 3
टॅग Trek It
Just Now!
X