News Flash

ट्रेक डायरी: रणथंबोर टायगर सफारी

राजस्थानमधील रणथंबोर राष्ट्रीय उद्यान हे वाघांसाठी प्रसिद्ध आहे. या जंगलाची व्याप्ती ३९२ चौरस किलोमीटर असून या क्षेत्रात २५ वाघ, ४० बिबटे,

| November 20, 2013 09:04 am

ट्रेक डायरी: रणथंबोर टायगर सफारी

राजस्थानमधील रणथंबोर राष्ट्रीय उद्यान हे वाघांसाठी प्रसिद्ध आहे. या जंगलाची व्याप्ती ३९२ चौरस किलोमीटर असून या क्षेत्रात २५ वाघ, ४० बिबटे, चिंकारा, अस्वल, चितळ, सांबर, निलगाय, काकर आदी वन्यप्राणी दिसतात. तसेच २६४ प्रकारचे पक्षीही इथे पाहण्यास मिळतात. या जंगलातच इसवीसन ९४४ साली बांधलेला रणथंबोर ऐतिहासिक किल्लाही आहे. हे जंगल आणि किल्ला तसेच या सहलीला जोडून जयपूर शहर सहलीचे निसर्ग टूर्सच्या वतीने आयोजन केले आहे. १७ ते २३ फेब्रुवारी २०१४ आणि ९ ते १५ मार्च दरम्यान या निसर्ग सहलीचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी विनोद काठे (९८७००८५०६२) यांच्याशी संपर्क साधावा.
केरळ जंगल सफारी
मिडर्थ या संस्थेतर्फे २२ ते २९ डिसेंबर या कालावधीत केरळमधील ‘पेराम्बीकुलम टायगर रिझर्व’ येथे वन्यजीव शिबिराचे आयोजन केले आहे. पेराम्बीकुलम हे वाघ, बिबटे, गवे, हत्ती याबरोबरच विविध प्रकारची हरणे, अडीचशेहून अधिक प्रकारचे पक्षी, फुलपाखरांसाठी प्रसिद्ध आहे. वालपराई या प्रेक्षणीय स्थळीही एक दिवस मुक्काम करण्याची संधी शिबिरार्थीना मिळेल. या शिबिरात मार्गदर्शनासाठी तज्ञ व्यक्ती असणार आहेत. अधिक माहितीसाठी सुरेंद्र देसाई (९८१९०९१९५४) यांच्याशी संपर्क साधावा.
‘बाइक टूर्स’
‘आनंदयात्रा पर्यटन’ तर्फे येत्या २४ नोव्हेंबर रोजी ‘बाइक राईड’ चे आयोजन करण्यात आले आहे. पुणे-पानशेत-वेल्हे-मढेघाट अशी ही ‘बाइक राईड’ होणार आहे. अधिक माहितीसाठी उमेश (९६०४५५२६५३) यांच्याशी संपर्क साधावा.
मुंबई-गोवा सायकल मोहीम
‘यूथ होस्टेल असोसिएशन ऑफ इंडिया’च्या महाराष्ट्र शाखेच्या वतीने मुंबई ते गोवा आणि पुन्हा गोवा ते मुंबई या सायकल मोहिमेचे आयोजन केले आहे. या मोहिमेसाठीची पहिली तुकडी ७ डिसेंबरला मुंबईहून निघणार असून ती १४ डिसेंबरला पणजीत पोहोचेल, तर दुसरी तुकडी १५ डिसेंबर रोजी पणजीहून निघून ती २२ डिसेंबर रोजी मुंबईत पोहोचणार आहे. या दोन्हीही तुकडय़ा सागरी महामार्गाच्या बाजूने ५५० किलोमीटरचा प्रवास करणार आहेत. अधिक माहितीसाठी ०२२-२४१२६००४  या क्रमांकावर संपर्क साधावा.
टकमक पदभ्रमण
‘कि ल्ले वसई मोहीम’ तर्फे येत्या २४ नोव्हेंबर रोजी टकमक येथे पदभ्रमणाचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी ९९३०६९७५७१ या क्रमांकावर संपर्क साधावा.
गोपाळगड, हेदवी, वेळणेश्वर सहल
‘निसर्ग दर्शन’ तर्फे येत्या २३, २४ नोव्हेंबर रोजी गुहागर, गोपाळगड, हेदवी, वेळणेश्वर सहलीचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी चंद्रशेखर शेळके (९८५०२६२६५७) यांच्याशी संपर्क साधावा.

सिंधुदुर्ग, विजयदुर्ग भ्रमण
‘नोमॅड्स’ तर्फे २४ ते २८ नोव्हेंबर दरम्यान सिंधुदुर्ग, विजयदुर्ग आणि जयगड आदी दुर्गाच्या भ्रमंतीचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी अनिकेत बाळ (९८२२४३३२५५) यांच्याशी संपर्क साधावा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2013 9:04 am

Web Title: ranthambore tiger safari
Next Stories
1 सियाचिन
2 इच्छुकांसाठी महत्त्वाचे
3 सुंदरबन व्याघ्रदर्शन
Just Now!
X