‘युमथांग व्हॅली’मधील शिंगबा अभयारण्य हे समृद्ध वनस्पती आणि पक्षीजीवनाबद्दल प्रसिद्ध आहे. पर्वतीय कुरणे, वन्यजीवन आणि युमथांग नदीच्या रम्य प्रवाहामुळे हा सारा प्रदेश विहंगम झाला आहे. या नदीकिनारी ‘ऱ्होडोडेनड्रोन’ची झाडे पाहण्यास मिळतात. लाल फिझंट, पर्वतीय तितर, शराटी चोचा, पांढऱ्या मानेचा कस्तुरा, हिरव्या पाठीची बल्गुली, हिमकबुतर आदी पक्षी इथे दिसतात. अशा या अभयारण्याच्या सफारीचे ११ ते १५ एप्रिल रोजी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या वतीने आयोजन केले आहे. अधिक माहिती आणि नावनोंदणीसाठी bnhs.programmes@gmail.com   या संकेतस्थळावर किंवा हॉर्नबिल हाउस (०२२-२२८२१८११/ २२८७१२०२) इथे संपर्क साधावा.
कान्हा जंगल सफारी
‘निसर्ग सोबती’तर्फे येत्या  १४ ते १७ जून दरम्यान मध्य प्रदेशमधील कान्हा राष्ट्रीय उद्यान सफारीचे आयोजन करण्यात आले आहे. वाघांसाठी प्रसिद्ध असलेल्या या जंगलात वाघांशिवाय बिबटे, जंगली कुत्री, नीलगाय, चौशिंगा, भेकर, चिंकारा, रानडुक्कर, सांबर, चितळ, हनुमान लंगूर अशा अनेक प्राण्यांचे वास्तव्य आहे. अडीचशेहून अधिक जातींच्या पक्ष्यांचीही इथे नोंद झाली आहे. अशा या जंगलात हत्ती आणि जीपमधून हे प्राणी दाखवण्याची सोय आहे. अधिक माहितीसाठी अभय जोशी (९९३०५६१६६७) यांच्याशी संपर्क साधावा.  
दोडी-दारवा ग्लेशियर ट्रेक
झेप संस्थेतर्फे येत्या १७ मे ते १ जून दरम्यान उत्तरांचलमधील गढवाल प्रदेशात उत्तरकाशीजवळ दोडी-दारवा ग्लेशियर ट्रेकचे आयोजन केले आहे. दोडीताल हे एक नितळ पाण्याने भरलेले निसर्गरम्य असे सरोवर आहे. या सरोवराची उंची समुद्रसपाटीपासून दहा हजार फूट आहे. या सरोवरापासून सुरू होणारा हा ट्रेक पुढे दारवा ग्लेशियपर्यंत (१३ हजार फूट उंची) जातो. या ट्रेकमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी देवेश अभ्यंकर किंवा मनोज भागवत (८०८७४४८२९७, ९८५००००४८७) यांच्याशी संपर्क साधावा.
बांधवगड व्याघ्र प्रकल्प
‘निसर्ग टूर्स’तर्फे येत्या ४ ते ८ जून दरम्यान मध्य प्रदेशमधील बांधवगड राष्ट्रीय उद्यान सफारीचे आयोजन करण्यात आले आहे. बांधवगड हे ऐतिहासिक काळापासून राजघराण्याचे राखलेले जंगल आहे. परंतु या राजेशाहीच्या काळातच झालेल्या मोठय़ा शिकारीनंतर महाराज मरतडसिंह यांनी शिकारीवर बंदी घातली. या जंगलाचे एका राखीव वनामध्ये रूपांतर केले. वन्यप्राण्यांना संरक्षण दिले, त्यांच्यासाठी जागोजागी लहानमोठे बांध घातले. हे संपन्न जंगल पुढे १९७५ साली व्याघ्र प्रकल्प म्हणून जाहीर झाले. एकूण ४४८ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या या जंगलात वाघांशिवाय बिबटे, जंगली कुत्री, नीलगाय, चौशिंगा, भेकर, चिंकारा, रानडुक्कर, सांबर, चितळ, हनुमान लंगूर अशा अनेक प्राण्यांचे वास्तव्य आहे. अडीचशेहून अधिक जातींच्या पक्ष्यांचीही इथे नोंद झाली आहे. अशा या जंगलात हत्ती आणि जीपमधून हे प्राणी दाखवण्याची सोय आहे. या सहलीमध्ये बांधवगडच्या जोडीनेच जबलपूरमधील भेडा घाटलाही भेट दिली जाणार आहे. अधिक माहितीसाठी विनोद काठे (९८७००८५०६२) यांच्याशी संपर्क साधावा.