12 December 2017

News Flash

ट्रेक डायरी : दुर्गनिबंध स्पर्धेचे आयोजन

गोनीदा दुर्गप्रेमी मंडळाच्या वतीने दरवर्षी आयोजित केले जाणारे दुर्ग साहित्य संमेलन यंदा २५ ते

मुंबई | Updated: December 19, 2012 2:18 AM

गोनीदा दुर्गप्रेमी मंडळाच्या वतीने दरवर्षी आयोजित केले जाणारे दुर्ग साहित्य संमेलन यंदा २५ ते २७ जानेवारी २०१३ रोजी विजयदुर्गवर होणार आहे. या संमेलनाच्या निमित्ताने निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेसाठी १) जलदुर्गाचे महत्त्व : काल, आज, उद्या २) शिवरायांचे जलदुर्ग विज्ञान ३) जलदुर्गावरील निसर्ग आणि पर्यावरण, त्याचे महत्त्व ४) विजयदुर्गचे सामरिक महत्त्व ५) मराठय़ांचे आरमार हे विषय आहेत. दोन हजार शब्दांपर्यंत लिहिलेले हे संशोधनपर निबंध १० जानेवारी २०१३ पर्यंत डॉ. विजय देव, सी-४०१, पाटे संस्कृती, तुळशीबागवाले कॉलनी, पुणे- ४११००९ या पत्त्यावर पाठवावेत. अधिक माहितीसाठी डॉ. विजय देव, डॉ. वीणा देव ( ९८२२४०१७५३) यांच्याशी संपर्क साधावा. या स्पर्धेतील विजेत्यांचा संमेलनात गौरव करण्यात येईल.     

ताडोबा जंगल सफारी
निसर्ग टूर्सतर्फे येत्या २६ फेब्रुवारी ते २ मार्च दरम्यान ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या सफारीचे आयोजन केले आहे. ताडोबा हा देशातील एक महत्त्वाचा व्याघ्र प्रकल्प आहे. ६२३ चौरस किलोमीटर क्षेत्र असलेल्या या जंगलाचा राजा वाघ आहे. इथे वाघांशिवाय बिबटय़ा, गवे, सांबर, चितळ, वानर, भेकर, मगरींसह अन्य प्राणीही दिसतात. अनेक पशुपक्ष्यांचा मुक्त वावर आहे. नवरंग, स्वर्गीय नर्तकसारखे दुर्मिळ पक्षी या जंगलात दिसतात. अधिक माहितीसाठी विनोद काठे (९८७००८५०६२) यांच्याशी संपर्क साधावा.

निसर्ग सहल
‘इनसर्च आऊटडोअर्स’तर्फे २७ ते ३० डिसेंबरदरम्यान आंबोली-सावंतवाडी निसर्ग सहलीचे तसेच २२ ते २८ डिसेंबर दरम्यान शारावती जंगल सफारीचे आयोजन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ०२०-२५४४३०९६ या क्रमांकावर संपर्क साधावा.
जलदुर्ग मोहीम
रायगड जिल्ह्य़ातील खांदेरी, कुलाबा, रेवदंडा, कोर्लई, जंजिरा आदी जलदुर्गावर पनवेलच्या जिद्द संस्थेच्यावतीने २५, २६ डिसेंबर रोजी भ्रमंतीचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी सुनील राज (९८६९३३१६१७)  यांच्याशी संपर्क साधावा.     

कच्छची भटकंती
कच्छचे धाकटे रण, रामसार क्षेत्र हे पक्षीनिरीक्षकांची पंढरी समजली जाते. हिवाळ्यात येथील पाणथळीमध्ये क्रौंच, रोहीत, झोळीवाला, करकोचा, शराटी, चमचा बदक आदी विविध प्रजातींच्या पक्ष्यांचे दर्शन घडते. या भागात खोकड, कोल्हा, रानमांजर, नीलगाय, चिंकारा, काळवीट आदी प्राण्यांचेही दर्शन घडते. अशा या कच्छच्या भटकंतीचे बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या वतीने १३ ते १६ जानेवारी २०१३ दरम्यान आयोजन केले आहे. अधिक माहिती आणि नावनोंदणीसाठी bnhs.programmes@gmail.com या संकेतस्थळावर किंवा हॉर्नबिल हाउस (०२२-२२८२१८११/ २२८७१२०२) इथे संपर्क साधावा.

First Published on December 19, 2012 2:18 am

Web Title: treak dairyessay on fort compitition
टॅग Treak Dairy