रणथंबोर जंगल सफारी

रणथंबोर हे राजस्थानातील एक महत्त्वाचे शुष्कपानगळीचे जंगल. व्याघ्रप्रकल्प म्हणून प्रसिद्ध असलेल्या या जंगलात वाघांशिवाय, बिबटे, नीलगाय, सांबर, चितळ, तरस आदी प्राणी, तसेच अनेक प्रजातींचे पक्षिगण दिसतात. या शिवाय विविध जातींच्या वृक्ष-वेलींसाठीही हे जंगल प्रसिद्ध आहे. गवताळ माळराने, बांबूची बेटे आणि तलाव या साऱ्यांमुळे इथे वन्यजीवांसाठी उत्तम अधिवास तयार झालेला आहे. अशा या रणथंबोर जंगलाच्या अभ्यास सफरीचे जीविधा संस्थेच्यावतीने येत्या २२ ते २७ एप्रिल रोजी आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी राजीव पंडित (९४२१०१९३१३) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

लोहगड, राजगड पदभ्रमण
‘झेप’ संस्थेतर्फे येत्या १३ एप्रिल रोजी लोहगड येथे, तर २० एप्रिल रोजी राजगड किल्ल्यावर पदभ्रमण मोहिमेचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी ९८५००००४८७ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ओंकार ओक