रूपकुंड मोहीम
रूपकुंड हा एक गिर्यारोहकांचा आवडता ट्रेक. उत्तराखंडमधील चमोली जिल्हय़ातील या ट्रेकमध्ये हिमालयाच्या विविध अंगांचे सुंदर दर्शन घडते. समुद्रसपाटीपासून ५०२९ मीटर उंचीवरील या ठिकाणी जाताना वाटेत रानफुले, हिमालयातील जंगल, वन्यप्राणी, हिमशिखरे, हिमनद्या अशी निसर्गाची विविध रूपे पाहण्यास मिळतात. ‘स्केलेटेल लेक’ असेही या स्थळाला म्हणतात. छायाचित्रणाची आवड असणाऱ्यांसाठी ही मोहीम विशेष आकर्षणाची ठरते. अशा या ‘रूपकुंड मोहिमे’चे ‘हिमगिरी ट्रेकर्स’ तर्फे येत्या १ ते १२ ऑक्टोबर दरम्यान मोहिमेचे आयोजन केले आहे. तरी इच्छुकांनी अधिक माहितीसाठी संतोष (९८२०९४७०९२) यांच्याशी संपर्क साधावा.
वारसास्थळ सहल
‘हेरिटेज इंडिया’तर्फे ३० ऑगस्ट रोजी कोतूळ, टाकळी ढोकेश्वर  आणि पळशी या ठिकाणी एकदिवसीय वारसा सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. या सहलीत कोतूळ येथील नसíगक गुहांमधील लवणस्तंभ आणि परिसरातील इतर सांस्कृतिक वारसा स्थळांची सविस्तर माहिती देणार आहेत. अधिक माहितीसाठी ९९२२४४२२३८ या क्रमांकावर संपर्क साधावा.
बांधवगड सफारी
‘निसर्ग सोबती’तर्फे २४ ते २७ डिसेंबर दरम्यान मध्य प्रदेशातील बांधवगड येथे जंगल सफारीचे आयोजन केले आहे. या जंगलात वाघ, बिबटय़ा, गवा, अस्वल, चितळ, सांबर, कोल्हा आदी प्राणी तसेच २०० हून अधिक प्रजातींचे पक्षी पाहण्यास मिळतात. अधिक माहितीसाठी अभय जोशी (९९३०५६१६६७) यांच्याशी संपर्क साधावा.
ताडोबा जंगल भ्रमंती
ताडोबा हे वाघांसाठी प्रसिद्ध असलेले जंगल आहे. आर्द-पानगळीच्या या जंगलात बांबू, ऐन, मोह, कांडेळ, धावडा, काटेसावर आदी प्रमुख वृक्ष आहेत. वाघांबरोबरच बिबटय़ा, सांबर, चितळ, वानर, अस्वल, गवा, रानडुक्कर, नीलगाय आदी प्रमुख प्राणी इथे आढळतात. याशिवाय २५० हून अधिक प्रजातींच्या पक्ष्यांचे इथे दर्शन घडते. अशा या जंगल अभ्यास सहलीचे ‘निसर्ग टूर्स’ तर्फे १७ ते २१ नोव्हेंबर या कालावधीत आयोजन केले आहे.  या सहलीमध्ये ताडोबा जंगलाबरोबर आनंदवन या प्रकल्पालाही भेट दिली जाणार आहे. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी विनोद काठे (९८७००८५०६२) यांच्याशी संपर्क साधावा.
‘रिव्हर राफ्टिंग’
‘प्रोएज’तर्फे येत्या ३० ऑगस्ट रोजी कोलाड येथे ‘रिव्हर राफ्टिंग’ मोहिमेचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी संदीप (९७६३०६२९१३) यांच्याशी संपर्क साधावा.
सायकल मोहीम
‘एसपीआर’तर्फे येत्या १२ सप्टेंबर रोजी जुन्या पुणे ते मुंबई महामार्गावर सायकल मोहिमेचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी शिल्पा (९९२०३६०३३६) यांच्याशी संपर्क साधावा.

‘ट्रेक इट’
धकाधकीच्या, स्पर्धेच्या या युगात विश्रांतीचे, विरंगुळय़ाचे, आनंद देणारे चार क्षण आता साऱ्यांनाच
आवश्यक झाले आहेत. दोन दिवस कुठेतरी जावे आणि भटकून रिफ्रेश व्हावे ही आता अनेकांची दैनंदिनी बनली आहे. यातूनच मग सहल, ट्रीप, टूर, आऊटिंग, विकएन्डपासून ते ट्रेकिंग, गिर्यारोहणापर्यंत अशा वेगवेगळय़ा नावांखाली भटकण्याची एक मोठी संस्कृती समाजात रुजू लागली आहे. भटकंतीच्या या वाटा, त्यावरचे सौंदर्यानुभव,गमतीजमती आणि थ्रिल घेऊन येणारी ‘ट्रेक इट’ आता आपल्याला दर गुरुवारी भेटणार आहे. ही पुरवणीआपल्याला कशी वाटते हे आम्हाला जरूर कळवा. तसेच नवीन स्थळांची माहिती, ट्रेकचा अनुभव,हटके छायाचित्र, आपल्या अनुभवांवर आधारित संक्षिप्त स्वरुपातील ब्लॉग लिहून आपण सहभागी होऊ शकता. संपर्कासाठी –  ‘ट्रेक-इट’साठी , लोकसत्ता,  ‘एक्स्प्रेस हाऊस’, प्लॉट क्र. १२०५/२/६, शिरोळे पथ,

शिवाजीनगर, पुणे – ४११००५.  Email -abhijit.belhekar@expressindia.com