चादर ट्रेक
लेह-लडाख परिसरातील चादर हा गिर्यारोहण जगातील एक प्रसिद्ध ट्रेक आहे. समुद्रसपाटीपासून ११ हजार फूट उंचीवर असलेल्या या बर्फाळ प्रदेशातून होणाऱ्या पदभ्रमंतीत बर्फवृष्टी अनुभवता येते. हिमालयातील जैवविविधता, निसर्ग या साऱ्यांचे या ट्रेकमध्ये विहंगम दर्शन होते. छायाचित्रणाची आवड असणाऱ्यांसाठी ही मोहीम संधी ठरू शकते. अशा या हिमालयातील वाटेवरच्या भटकंतीचे ‘हिमगिरी ट्रेकर्स’ तर्फे येत्या ७ ते १७ फेब्रुवारी २०१६ दरम्यान आयोजन केले आहे.
अधिक माहितीसाठी संतोष (९८२०९४७०९२) यांच्याशी
संपर्क साधावा.
अंबरनाथ मंदिर, लोणाड सहल
‘होरायझन’तर्फे येत्या २ ऑक्टोबर रोजी अंबरनाथ मंदिर, लोणाड येथील सूर्यमंदिर, बौद्ध लेणी परिसरात तसेच ४ ऑक्टोबर रोजी रायगड अभ्यास सहलीचे आयोजन केले आहे. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी डॉ. मिलिंद पराडकर (९६१९००६३४७) यांच्याशी संपर्क साधावा.
धबधब्यांची भटकंती
‘नोमॅड्स’ तर्फे येत्या १ ते ४ ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रातील प्रसिद्ध १० धबधब्यांच्या भटकंतीचे आयोजन केले आहे. ओझर्डे, सवतसडा, मार्लेश्वर, नापणे, मणचे, सावडाव, सैतवडा, आंबोली, कावळेशेत आणि नांगरतास आदी धबधब्यांचा या सहलीत समावेश आहे. अधिक माहितीसाठी अनिकेत बाळ (९८२२४३३२५५) यांच्याशी संपर्क साधावा.
कास पठार अभ्यास सहल
‘अवनी विहार’तर्फे येत्या ३-४ ऑक्टोबर रोजी कास पठार, ठोसेघर धबधबा अभ्यास सहलीचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी विकास जयवंत (९९३०९३५१९३) यांच्याशी संपर्क साधावा.
पेंच जंगल सफारी
‘वाइल्ड डेस्टिनेशन’तर्फे ४ ते ६ डिसेंबर दरम्यान मध्य प्रदेशातील पेंच येथे जंगल सफारीचे आयोजन केले आहे. या जंगलात बिबटय़ा, अस्वल, चितळ, सांबर, कोल्हा आदी प्राणी, तसेच २०० हून अधिक प्रजातींचे पक्षी पाहण्यास मिळतात. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी अमित भुस्कुटे (९८१९२१५१२७) यांच्याशी संपर्क साधावा.

‘ट्रेक इट’
धकाधकीच्या, स्पर्धेच्या या युगात विश्रांतीचे, विरंगुळय़ाचे, आनंद देणारे चार क्षण आता साऱ्यांनाच आवश्यक झाले आहेत. दोन दिवस कुठेतरी जावे आणि भटकून रिफ्रेश व्हावे ही आता अनेकांची दैनंदिनी बनली आहे. यातूनच मग सहल, ट्रीप, टूर, आऊटिंग, विकएन्डपासून ते ट्रेकिंग, गिर्यारोहणापर्यंत अशा वेगवेगळय़ा नावांखाली भटकण्याची एक मोठी संस्कृती समाजात रुजू लागली आहे. भटकंतीच्या या वाटा, त्यावरचे सौंदर्यानुभव, गमतीजमती आणि थ्रिल घेऊन येणारी ‘ट्रेक इट’ आता आपल्याला दर गुरुवारी भेटणार आहे. ही पुरवणी आपल्याला कशी वाटते हे आम्हाला जरूर कळवा. तसेच नवीन स्थळांची माहिती, ट्रेकचा अनुभव, हटके छायाचित्र, आपल्या अनुभवांवर आधारित संक्षिप्त स्वरुपातील ब्लॉग लिहून आपण सहभागी होऊ शकता. संपर्कासाठी – ‘ट्रेक-इट’साठी , लोकसत्ता, ‘एक्स्प्रेस हाऊस’, प्लॉट क्र. १२०५/२/६, शिरोळे पथ, शिवाजीनगर, पुणे – ४११००५.
Email – abhijit.belhekar@expressindia.com

businessman was cheated
धक्कादायक! इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचा व्हिडीओ वापरुन व्यावसायिकाची दहा लाखांची फसवणूक
how much Rihanna charges to perform at a private event (1)
रिहाना एका कार्यक्रमासाठी किती मानधन घेते? अनंत अंबानी-राधिका मर्चेंटच्या प्री-वेडिंगमध्ये करणार परफॉर्म
Marathi newspaper is not available in Tejas Express
मुंबई : तेजस एक्स्प्रेसमध्ये मराठीचे वावडे
Ajni Chowk
नागपूर : पाच रस्ते, मेट्रोस्थानकामुळे अजनी चौक ‘अपघातप्रवण’! नीरीच्या नियोजित जागेवर मेट्रो स्थानक न बांधल्याचा फटका