News Flash

कास पठार – सज्जनगड

पावसाळा सुरू झाला, की अनेकांची पावले फुलांच्या पठाराकडे वळतात. कासच्या रूपाने महाराष्ट्राला फुलांचे पठार लाभले आहे.

| August 20, 2015 04:33 am

ट्रेक डायरी
पावसाळा सुरू झाला, की अनेकांची पावले फुलांच्या पठाराकडे वळतात. कासच्या रूपाने महाराष्ट्राला फुलांचे पठार लाभले आहे. जांभा खडकाच्या या पठारावर ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात शेकडो जातींची हजारो रानफुले उमलतात. हजारो रानफुलांच्या या रंगसोहळय़ात हे पठार बुडून जाते. कवल्या, तेरडा, पंद, कचोरा, फुलकाडी, नीलिमा अशी ही नाना फुले आणि त्यांचे अद्भुत रंग! कास पठाराची हीच निसर्ग नवलाई तज्ज्ञांच्या बरोबर अनुभवण्यासाठी ‘निसर्ग टूर्स’तर्फे येत्या २४ आणि २५ सप्टेंबर दरम्यान अभ्यास सहलीचे आयोजन केले आहे. कास पठाराबरोबरच या सहलीमध्ये सज्जनगड आणि ठोसेघर धबधब्यालाही भेट दिली जाणार आहे. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी विनोद काठे (९८७००८५०६२) यांच्याशी संपर्क साधावा.

धबधब्यांची भटकंती
‘नोमॅड्स’ तर्फे येत्या ३ ते ६ सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रातील प्रसिद्ध १० धबधब्यांच्या भटकंतीचे आयोजन केले आहे. ओझर्डे, सवतसडा, मार्लेश्वर, नापणे, मणचे, सावडाव, सैतवडा, आंबोली, कावळेशेत आणि नांगरतास आदी धबधब्यांचा या सहलीत समावेश आहे. अधिक माहितीसाठी अनिकेत बाळ (९८२२४३३२५५) यांच्याशी संपर्क साधावा.
तांदुळवाडी भ्रमंती
‘एसपीआर’तर्फे येत्या ३० ऑगस्ट रोजी तांदुळवाडी भटकंतीचे आयोजन केले
आहे. अधिक माहितीसाठी शिल्पा (९९२०३६०३३६) यांच्याशी संपर्क साधावा.
आंबोली अभ्यास सहल
‘वसुंधरा आऊटडोअर्स’तर्फे येत्या २६ ते २९ सप्टेंबर दरम्यान आंबोली अभ्यास सहलीचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी शिल्पा (९९७०१८०३१३) यांच्याशी संपर्क साधावा.
‘कुवारी पास’ मोहीम
हिमालयातील अनेक प्रसिद्ध ट्रेकपैकी हा एक ट्रेक आहे. या पदभ्रमणमार्गाचा शोध लॉर्ड क्रुझन रिचर्ड यांनी १९०५ साली लावला म्हणून याला ‘क्रुझन ट्रेल’असेही म्हणतात. ‘कुवारी पास’ची उंची समुद्रसपाटीपासून ४६५२ मीटर किंवा १५३०० फूट आहे. हे पदभ्रमण विविध डोंगरी गावे, नद्या, झरे, जंगले, डोंगरदऱ्यांमधून जाते. रोडोड्रेडन, ओक, देवदारच्या जंगलातून जाणारी ही वाट निसर्गाचे सुंदर दर्शन घडते. नंदादेवी, कामेत, द्रोणागिरी, त्रिशूल, बेरथोली, हाथी घोडी पर्वत, निळकंठ आदी हिमशिखरे या मोहिमेत दिसतात. छायाचित्रणाची आवड असणाऱ्यांसाठी ही मोहीम विशेष आकर्षणाची ठरते. अशा या ‘कुवारी पास’ मोहिमेचे ‘हिमगिरी ट्रेकर्स’ तर्फे येत्या १४ ते २३ नोव्हेंबर दरम्यान आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी संतोष (९८२०९४७०९२) यांच्याशी संपर्क साधावा.

‘ट्रेक इट’
धकाधकीच्या, स्पर्धेच्या या युगात विश्रांतीचे, विरंगुळय़ाचे, आनंद देणारे चार क्षण आता साऱ्यांनाच आवश्यक झाले आहेत. दोन दिवस कुठेतरी जावे आणि भटकून रिफ्रेश व्हावे ही आता अनेकांची दैनंदिनी बनली आहे. यातूनच मग सहल, ट्रीप, टूर, आऊटिंग, विकएन्डपासून ते ट्रेकिंग, गिर्यारोहणापर्यंत अशा वेगवेगळय़ा नावांखाली भटकण्याची एक मोठी संस्कृती समाजात रुजू लागली आहे. भटकंतीच्या या वाटा, त्यावरचे सौंदर्यानुभव, गमतीजमती आणि थ्रिल घेऊन येणारी ‘ट्रेक इट’ आता आपल्याला दर गुरुवारी भेटणार आहे. ही पुरवणी आपल्याला कशी वाटते हे आम्हाला जरूर कळवा. तसेच नवीन स्थळांची माहिती, ट्रेकचा अनुभव, हटके छायाचित्र, आपल्या अनुभवांवर आधारित संक्षिप्त स्वरुपातील ब्लॉग लिहून आपण सहभागी होऊ शकता. संपर्कासाठी – ‘ट्रेक-इट’साठी , लोकसत्ता, ‘एक्स्प्रेस हाऊस’, प्लॉट क्र. १२०५/२/६, शिरोळे पथ, शिवाजीनगर, पुणे – ४११००५.Email – abhijit.belhekar@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2015 4:33 am

Web Title: trek dairy 7
टॅग : Trek Dairy
Next Stories
1 पावनखिंडीतील जागर
2 रूपकुंड मोहीम
3 देखणा खंडय़ा
Just Now!
X