हिमालयाच्या कुशीत वसलेलं भूतान जैवविविधता संपन्न आहे. पक्ष्यांमध्ये विविध कस्तुर, विविध धनेश, विविध सातभाई, पोपटचोचे, हिरवी कोकिळा व विविध वटवटे इथे दिसतात. फुलपाखरांकरितासुद्धा भूतान प्रसिद्ध आहे. अशा या भूतानच्या सहलीचे ७-१४ नोव्हेंबर रोजी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या वतीने आयोजन केले आहे. अधिक माहिती आणि नावनोंदणीसाठी ुल्लँ२.स्र्१ॠ१ंेी२@ॠें्र’.ूे या संकेतस्थळावर किंवा हॉर्नबिल हाउस (०२२-२२८२१८११/ २२८७१२०२) इथे संपर्क साधावा.
निसर्ग छायाचित्रण
अ‍ॅपेक ट्रेनिंग संस्थेच्या वतीने दिवाळी सुटीमध्ये २५ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर दरम्यान मध्य प्रदेशातील बांधवगड व्याघ्र प्रकल्पामध्ये वन्यजीव छायाचित्रण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी अर्चना जोशी (९३२३९५०९७७) यांच्याशी संपर्क साधावा.
कृषिपर्यटन सहल
‘कल्पविहार अ‍ॅडव्हेंचर्स’ या गिरिभ्रमण संस्थेच्या वतीने १ सप्टेंबर रोजी ‘महिला विशेष’ एक दिवसीय कृषिपर्यटन सहलीचे आयोजन करण्यात आले आह़े  मुंबईजवळील आसनगाव येथे जाणाऱ्या या सहलीअंतर्गत सहभागी महिलांना प्रत्यक्ष शेतीत काम करण्याचा, तसेच विविध फुलांची ओळख करून घेण्याचा आणि बैलगाडीतून फेरफटका मारण्याचा आनंद लुटता येणार आह़े  सहभागी होण्यासाठी संपर्क – ९८२०६८४७२३़
दांडेली सहल
‘इनसर्च आउटडोअर्स’ संस्थेतर्फे येत्या ३० ऑगस्ट ते ३ सप्टेंबर दरम्यान ज्येष्ठ नागरिकांसाठी निसर्ग सहलीचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी ०२०- २५४४३०९६ या क्रमांकावर संपर्क साधावा.
कास पठार, सज्जनगड भ्रमंती
आनंद सहल पर्यटन संस्थेतर्फे सप्टेंबर महिन्याच्या प्रत्येक शनिवार आणि रविवारी कास पठार, सज्जनगड आदी ठिकाणी भ्रमंतीचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी शैलजा बोकील (९८८११६५७७४) यांच्याशी संपर्क साधावा.
अरुणाचल सहल
‘निसर्ग सोबती’तर्फे १० ते १५ नोव्हेंबर दरम्यान अरुणाचल प्रदेशमधील पूर्व कामेंग परिसरातील व्याघ्र प्रकल्पाच्या भेटीचे आयोजन केले आहे. या जंगलात वाघाशिवाय बिबटय़ा, रानमांजर, रानकुत्री, रानडुक्कर, कोल्हे, गवा, हत्ती, भेकर, सांबर आदी प्राणी तसेच ३०० हून अधिक प्रकारचे पक्षी दिसतात. यामध्ये व्हाइट विण्ड वूड डक, आयबीस बिल, ओरिएन्टल बे आउल, धनेश आदी महत्त्वाच्या पक्ष्यांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी अभय जोशी (९९३०५६१६६७.) यांच्याशी संपर्क साधावा.